Gajanan Maharaj: 'गण गण गणात बोते'च्या जयघोषात पालखीचे विदर्भाच्या हद्दीमध्ये जंगी स्वागत ; वारकऱ्यांकडून टाळमृदुंगाचा गजर

Vidharbha news : हजारो गजानन भक्त हे श्री च्या पालखी सोबत पायदळ चालत शहरामध्ये दाखल झाले होते.
Gajanan Maharaj: 'गण गण गणात बोते'च्या जयघोषात पालखीचे विदर्भाच्या हद्दीमध्ये जंगी स्वागत ; वारकऱ्यांकडून टाळमृदुंगाचा गजर
Updated on

Latest Gajanan Maharaj Palkhi News : 'गण गण गणात बोते' ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम अशा जय घोषामध्ये विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज शेगांव यांच्या पालखीचे मराठवाडा विदर्भाच्या हद्दीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले.

टाळ मृदंगाच्या स्वराच्या गजरात परिसर भक्तिमय झाला होता.विदर्भाच्या हद्दीमध्ये प्रवेश करतात फटाक्याची आताच बाजी,रांगोळी फुलांची उधळण करत 'श्री' च्या पालखीचे स्वागत करण्यात आले,परिसर भक्तीमय वातावरणामध्ये न्हाऊन निघाला होता.हजारो भक्तांच्या प्रशासनाच्या वतीने 'श्री' च्या पालखीचे भक्तीमय वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले,माळ सावरगाव ते सिंदखेड राजा शहरापर्यंत हजारो गजानन भक्त हे श्री च्या पालखी सोबत पायदळ चालत शहरामध्ये दाखल झाले होते.

श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे ५५ वे वर्ष असून पालखी सोबत दोन अश्व, ७२० वारकरी आहेत.श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे दुपारी ३ वाजेच्या दरम्यान जिल्ह्यामध्ये आगमन झाले आहे,यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी,भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, मनोज कायंदे,सतीश काळे, सीताराम चौधरी,सतीश तायडे,जगन सहाणे,विजय तायडे,ॲड.संदीप मेहेत्रे,योगेश जाधव, मधुकर गव्हाड, सतीश सरोदे,गणेश सानप, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम,नायब तहसीलदार मनोज सातव,यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती.

Gajanan Maharaj: 'गण गण गणात बोते'च्या जयघोषात पालखीचे विदर्भाच्या हद्दीमध्ये जंगी स्वागत ; वारकऱ्यांकडून टाळमृदुंगाचा गजर
Gajanan Maharaj Palkhi : श्रीं च्या पालखीचे पंढरपूरहून शेगावकडे प्रस्थान; ११ ऑगस्टला स्वगृही होणार आगमन

श्री संत गजानन महाराज संस्थानची पालखीने पायी प्रवास करत ता.१५ जुलै रोजी पंढरपूरला पोहचली होती, पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेऊन पंढरपूर वरून 'श्री' ची पालखी २१ जुलै रोजी शेगाव साठी मार्गस्थ झाली होती.

ता.३ ऑगस्ट रोजी 'श्री' ची पालखी जिल्ह्यात दाखल झाली असुन यावर्षी 'श्री' च्या पालखी सोहळ्याचे ५५ वर्ष असून शेगांव ते पंढरपूर पर्यत ७२५ किलोमीटर आणि पंढरपूर ते शेगांव परतीचा प्रवास हा ५५० किलोमीटरचा असून श्री च्या पालखी मधील वारकरी १३०० किलोमीटरचा पायी प्रवास पुर्ण करणार आहे.'श्री'ची पालखी शहरांमध्ये दाखल होतात,स्थानिक नागरिकांकडून ठीक ठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले.

तसेच शहरात दाखल होताच जिजामाता नगर मध्ये भाविकांनी रांगोळी व फुले टाकून 'श्री' च्या पालखीचे स्वागत करण्यात आले.ऐतिहासिक रामेश्वर मंदीर येथे 'श्री' च्या पालखी सोबत असलेल्या वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती,त्यानंतर रंगमहाल, काळाकोट मार्ग तहसील कार्यालया समोरून जिजामाता विद्यालयामध्ये 'श्री' पालखी मुक्कामासाठी थांबली आहे. यावेळी भक्तांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहुन श्री.संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले.ता.४ ऑगस्ट रोजी सकाळी पुढील प्रवासासाठी किनगांव राजा कडे पालखी प्रस्थान करणार आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने,उपविभागीय अधिकारी मनीषा कदम मार्गदर्शनाखाली ठाणेदार ब्रह्मदेव शेळके,ठाणेदार विनोद नरवाडे,पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप,श्रावण डोंगरे,यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Gajanan Maharaj: 'गण गण गणात बोते'च्या जयघोषात पालखीचे विदर्भाच्या हद्दीमध्ये जंगी स्वागत ; वारकऱ्यांकडून टाळमृदुंगाचा गजर
Gajanan Maharaj Prakat Din : ‘श्रीं’च्‍या प्रगट दिन उत्‍सवाची सांगता

'श्री' च्या पालखी पायदळ वारीचे अखंड ५५ वर्षाची परंपरा : दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी शेगाव ते पंढरपूर व पंढरपूर ते शेगाव अशी 'श्री'च्या पायदळ वारीचे अखंड ५५ वर्षाची परंपरा या वर्षी पाहायला मिळाली आहे, श्री ची पालखी पायदळ वारीमध्ये वारकरी,पताकाधारी, टाळकरी, सेवेकरी यांचा समावेश आहे.यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहनांचा ताफा सोबत असतो.

'श्री' च्या पालखीचा पुढील प्रवास :- ता.४ ऑगस्ट रोजी बीबी येथे मुक्काम ,५ ऑगस्ट रोजी लोणार मुक्काम, ६ ऑगस्ट रोजी मुक्काम मेहकर , ७ ऑगस्ट रोजी जानेफळ मुक्काम , ८ ऑगस्ट रोजी शिरला नेमाने मुक्काम, ९ ऑगस्ट रोजी आवरा मुक्काम, १० ऑगस्ट रोजी मुक्काम खामगांव, ११ ऑगस्ट रोजी शेगांव ला पोहचणार आहे.

श्वान झाला 'श्री' चा वारकरी : श्री.संत गजानन महाराज यांच्या पालखी सोबत पंढरपूर वरुन 'श्री' च्या श्वान सोबत चालत असल्यामुळे 'श्री' च्या पालखी सोबत वारकरी झाला असल्याचे पहायला मिळते.

Gajanan Maharaj: 'गण गण गणात बोते'च्या जयघोषात पालखीचे विदर्भाच्या हद्दीमध्ये जंगी स्वागत ; वारकऱ्यांकडून टाळमृदुंगाचा गजर
Gajanan Maharaj Paduka: श्री गजानन महाराजांच्‍या चैतन्‍य पादुका नाशिकमध्ये; भाविकांना संपर्काचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.