काही हटके! १३५ किलो वजनाच्या गजूला मिळाला ४० व्यावर्षी रोजगार

Gaju weighing 135 kg got 40 years of employment Yavatmal news
Gaju weighing 135 kg got 40 years of employment Yavatmal news
Updated on

उमरखेड (जि. यवतमाळ) : माणसाचा जन्म होताच तो तिळातिळाने वाढतो. जिवनाच्या खडतर प्रवासात वय आणि वजनही वाढू लागते. परंतु, त्याला काही मर्यादा असते. या सर्व गोष्टींमध्ये उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील गजानन शिवशंकर काचरडे अपवाद ठरला. गजानन जन्मानंतर वयाच्या दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी दहा, दहा किलोप्रमाणे सतत वजनाने वाढत गेला. १८ वर्षांपर्यंत त्याचे वजन १८० किलोच्या आसपास वाढतच गेले.

वाढत्या वजनामुळे गजानन लहानपणी जपानी छोट्या सुमो सारखा अगडबंब दिसायला लागला. अशा परिस्थितीत त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. त्याला धड चालणे, फिरणे, झोपणे याशिवाय वाढत्या अंगानुसार वर्षातून दोनदा नवीन कपड्यांचा जोड शिवून घेणे, यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. लहान मुलांकडून चिडवणे आणि हिन भावनेची वागणूक मिळत होती.

अशाही परिस्थितीत त्याने आपले शिक्षण बीएपर्यंत सुरूच ठेवले. आपल्या वाढलेल्या वजनामुळे त्याला कोणतेही काम करणे कठीण होऊन बसले होते. कुठे नोकरीही मिळण्याची शक्यता नव्हती. अशा परिस्थितीत उमरखेड येथील दोन समितीतर्फे गजाननला केवळ रोजगार निर्माण व्हावा म्हणून प्रिंटर मशीन देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्याला जीवन जगण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला.

आज गजाननचे वय ४० आहे. वयाच्या २० वर्षांपर्यंत वाढत असलेले वजन मात्र कमी कमी होऊन आज १३५ किलोवर आले. विडूळ येथील एका छोटेखानी कार्यक्रमात केवळ समाजकार्य घडावे या उद्देशाने गजाननला प्रिंटर मशीन बहाल करण्यात आली. गजूच्या मते स्वतःला आवडते तसेच जगा. कारण, जीवनामध्ये वन्समोअर कधीच नसतो. त्याचे हे विचार सर्वसाधारण माणसाला सर्व काही सांगून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.