मेळघाटातील घटांग बनले ‘नवोदयचे गाव’

उज्ज्वल यशाची परंपरा कायम; ४५ घरांपैकी १३ घरची मुले नवोदयमध्ये
Ghatgat in Melghat becomes Navodayache village
Ghatgat in Melghat becomes Navodayache village
Updated on

मांजरखेड कसबा (जि. अमरावती) - मेळघाटच्या पायथ्याशी वसलेल्या जिल्हा परिषद शाळा घटांग येथील दोन विद्यार्थ्यांनी यावर्षी नवोदयच्या परीक्षेत यश मिळविले आहे. त्यांच्या या यशामुळे ‘नवोदयचे गाव’, अशी गावाची नवीन ओळख निर्माण झाली आहे. आदर्श शिक्षक वैजनाथ इप्पर यांच्या परिश्रमातून आतापर्यंत ४५ घरे असलेल्या या गावातील तब्बल १३ घरांतील विद्यार्थ्यांची नवोदयमध्ये निवड झाली आहे. वैजनाथ पॅटर्नमुळे शहरातील विद्यार्थीसुद्धा घटांगच्या शाळेत प्रवेश घेत आहेत.

३० एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेला जिल्ह्यात ९२५६ विद्यार्थी बसले होते. यामधून ग्रामीण भागातून ७५ टक्के व शहरी भागातून २५ टक्के, असे एकूण ८० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घटांग येथील इयत्ता पाचवीमधील खुशी रमेश येवले व पीयूष अशोक नागले या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावल्याने त्यांची नवोदय विद्यालयाकरिता निवड झाली आहे. यापूर्वी २०१७-१८ मध्ये तीन, २०१८-१९ मध्ये दोन, २०१९-२० मध्ये दोन, २०२०-२१ मध्ये चार, असे सुमारे अकरा विद्यार्थी नवोदयचे शिक्षण घेत आहेत.

नवोदयप्रमाणे यापूर्वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतसुद्धा १८ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळविले आहे. मुख्याध्यापक श्रीकांत तोटे व वैजनाथ इप्पर या दोन्ही शिक्षकांच्या परिश्रमामुळे या शाळेने सन्मान प्रेरणेचा, सन्मान गुणवत्तेचा या उपक्रमात चिखलदरा तालुक्यात तिसरा क्रमांक पटकाविला होता. कोरोना काळातसुद्धा स्वस्थ न बसता शालेय रंगरंगोटी करून शाळेचा चेहरामोहरा बदलविला आहे.

याच कालावधीत या शाळेतील चार विद्यार्थ्यांनी मागील वर्षी नवोदय परीक्षेत चार विद्यार्थ्यांनी यश मिळविले. त्यांच्या या यशाबद्दल गावचे सरपंच दीपेश बेलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास येवले, मुख्याध्यापक श्रीकांत तोटे व शिक्षक वैजनाथ इप्पर यांनी कौतुक केले.

गरीब लोकांची अनोखी श्रीमंती

घटांग जेमतेम ४५ कुटुंबे असलेले गाव. रोज मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या या आदिवासींना आपली मुले शिकली पाहिजेत हे मनापासून वाटते. शिक्षणाकरिता आपला सहभाग असावा म्हणून पैशांनी गरीब असलेल्या या लोकांनी मनाची श्रीमंती दाखवत दोन वर्षांत एक लाख रुपयांचा लोकसहभाग नोंदविला आहे. यावर्षीसुद्धा शाळेच्या पहिल्याच दिवशी नऊ हजार रुपये लोकसहभाग नोंदविला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.