साहेबऽऽ माझ्या पत्नीला कुटुंबीयांनी सासरी फरफटत नेले

Girl was taken home by Maher
Girl was taken home by MaherGirl was taken home by Maher
Updated on

मोर्शी (जि. अमरावती) : सज्ञान असलेल्या युवक व युवतीने काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह (Love marriage) केला. मात्र, मुलीकडील मंडळींना हा विवाह मान्य नव्हता. यामुळे कुटुंबीयांनी मुलीला घरी येण्यास सांगितले. तरीही मुलगी घरी परतण्यास तयार नव्हती. यामुळे चिडलेल्या कुटुंबीयांनी सासरी जाऊन मुलीला फरफटत घरी नेले. आपल्या पत्नीला तिचे कुटुंबीय जबरदस्ती घरी घेऊन गेल्याचा आरोप पतीने पोलिसांमध्ये दाखल तक्रारीत केला आहे. (Girl was taken home by Maher)

प्राप्त माहितीनुसार, मोर्शी तालुक्यातील युवकाचे जवळच्याच गावात राहणाऱ्या युवतीसोबत प्रेमसंबंध (Love) होते. यामुळे त्यांनी आर्यसमाज मंदिरामध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाला मुलीकडील कुटुंबीयांचा विरोध होता. परंतु, मुलाकडील मंडळींनी सुनेचा स्वीकार केला. त्यामुळे युवक भावी वधूला घेऊन काही दिवसांपूर्वीच गावामध्ये घरी पोहोचला आणि दोघांचाही सुखी संसार सुरू झाला.

Girl was taken home by Maher
बलुचिस्तान भूकंपानं हादरलं; 80 हून अधिक घरं कोसळली

अचानक एका वाहनामध्ये मुलीच्या माहेरकडील मंडळी मुलाच्या घरी पोहोचली. दोन कुटुंबीयांमध्ये पसंती व नापसंतीच्या मुद्यावरून चर्चा झाली. चर्चेनंतर युवतीला माहेरच्यांनी फरफटत नेले, असा आरोप युवकाने मोर्शी ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे. पत्नीला माहेरच्यांनी ओढत नेल्याचा आरोप युवकाने तक्रारीत केल्यानंतर मुलीसह पालकांना पोलिसांनी चौकशीसाठी ठाण्यात बोलविले. परंतु, शनिवारपर्यंत मुलगी किंवा माहेरचे नातेवाइक पोलिसांपर्यंत पोहोचले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

...तोपर्यंत कारवाई करणे शक्य नाही

मुलाने आर्यसमाज मंदिरात लग्न (Love marriage) केल्याचे प्रमाणपत्र पोलिसांना दाखविले. त्यात दोघेही सज्ञान असल्याचे दिसून येते, असे मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबाडे यांनी सांगितले. पत्नीला तिच्या माहेरच्या नातेवाइकांनी फरफटत नेल्याचा व्हिडिओसुद्धा मुलाने दाखविला. मात्र, जोपर्यंत मुलीचे बयाण नोंदविले जात नाही. ती तक्रार देत नाही, तोपर्यंत या प्रकरणात पोलिसांना कारवाई करणे शक्य नाही, असे श्रीराम लांबाडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.