खापरखेडा - अज्ञात चोराने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी ८ हजार रुपये, असा एकूण ६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेतील फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
खापरखेडा पोलिस ठाण्याच्या डीबी पथकासह अधिकारी घटनास्थळावर पोहताच घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. यावरुन अधिक संशय बळावल्याने घरफोडी ही बनावट स्वरूपाची असल्याचे प्रथमदर्शनी तपासादरम्यान समोर येवू लागले. लगेच डिबी स्काॅड पोलिसांनी तपासचक्रे फिरवून संशयित आरोपीस ताब्यात घेऊन विचारपूस करण्याकरिता पोलिस ठाण्यात आणण्यात आले.