Akola News : विषारी मादी सापांच्या २५ पिल्लांना जीवनदान; शाळेची वर्गखोली उघडताच...

Snake
Snake
Updated on

अकोला : शाळेच्या वर्गखोलीत सापडलेल्या एका विषारी मादीसह तिच्या २५ पिल्लांना निर्जन वस्तीत सोडण्याची कामगिरी सर्पमित्र कुमार सदांशिव व इतरांनी केली.

Snake
Mumbai News : आली लहर केला कहर! पठ्ठ्याने ट्रक थेट समुद्रातच घुसवला

राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू येथील एका खासगी शाळेत कार्यरत कर्मचाऱ्याला शाळेच्या वर्ग खोलीत एक साप दिसला. त्यामुळे घाबरलेल्या कर्मचाऱ्याने याबाबत पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सर्पमित्र कुमार सदांशिव यांना माहिती दिली.

माहिती मिळताच कुमार सदांशिव, आपले सहकारी सूरज सदांशिव, सर्पमित्र प्रशांत नागे, प्रफुल्ल सदांशिव, संदीप शेगोकार, राजेश रायबोले यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले.

Snake
Buldhana Bus Accident : अपघात टायर फुटल्याने नव्हे तर… ; नागपूर परिवहन विभागाचा अहवाल

त्यांनी वर्गखोलीचा दरवाजा उघडल्यानंतर त्यांना पूर्ण रूममध्ये सापांची पिल्ले दिसली. त्यामुळे सर्पमित्रांनी अत्यंत शिताफीने त्या सर्व सापांच्या पिल्लांना सुखरूप पकडले. त्यानंतर मादा सापाचा शोध घेतला असता मादा दुसऱ्या रूममध्ये दिसून आली. मादा घोणस ही अत्यंत आक्रमक होती व या घोणस विषारी सापाला पकडण्यास अथक परिश्रम घ्यावे लागले.

यावेळी सापांच्या पिल्लांची मोजणी केली असता पंचवीस पिल्ले आढळून आले. या सर्व प्रकाराची माहिती अकोला वन विभागाचे आरएफओ थोरात यांना देण्यात आली. त्यानंतर सापांना जीवनदान देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.