गोंदिया - संविधानात प्रत्येक धर्माचा आदर आहे. समानता आहे. परंतु, आरएसएस आणि नरेंद्र मोदी संविधानावर आक्रमण करून संविधानाची हत्या करू पाहात आहेत. ते समोरून बोलत नाहीत, जनता तुटून पडेल, म्हणून ते बंद दाराआड हे कारस्थान रचत आहेत..त्यांचे कारस्थान हाणून पाडण्याची, संविधान वाचविण्याची ही लढाई आहे, असे मत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाचे वाचन केले असते, तर संविधानाचा आदर केला असता, मात्र त्यांनी संविधानाचे वाचन केलेच नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला..येथील सर्कस ग्राउंड येथे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. १२) राहुल गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. दुपारी दीड वाजता होणारी ही सभा सायंकाळी सव्वाचारला सुरू झाली. तरीही राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी सभास्थळी हजारो नागरिक एकवटून होते. 'आपका मुड कैसा है' या वाक्याने राहुल गांधी यांनी भाषणाला सुरवात केली..सुरवातीलाच संविधान बदलाची भाषा वापरणाऱ्या आरएसएस आणि नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, आमदारांना कोट्यवधी रुपये देऊन महाराष्ट्रातील सरकार पाडली. गेल्या दहा वर्षांत एकाही शेतकऱ्यांचे कर्ज या सरकारने माफ केले नाही, उलट अदानी, अंबानी यांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. हे सरकार शेतकरी हिताची नाही, तर करोडपतींच्या हिताची आहे..राहुल गांधी पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे उद्योग, प्रकल्प दुसऱ्या राज्यात हलविण्याचे काम नरेंद्र मोंदींनी केले. शेतकऱ्यांबाबत तीन काळे कायदे या सरकारने केले. हे कायदे शेतकऱ्यांचे फायद्याचे आहेत, असे नरेंद्र मोदी सांगत होते, मग शेकडो शेतकरी रस्त्यावर का उतरले? असा प्रश्न उपस्थित करीत राहुल गांधी यांनी सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही, असा आरोप केला. युवकांना बेरोजगाराच्या खाईत लोटण्याचेही काम सरकारने केल्याचेही ते म्हणाले..जीएसटीवर बोलताना राहुल गांधी म्हणाले, सर्वसामान्य जनतेसाठी जितकी जीएसटी लागू आहे, तितकीच जिएसटी अदानी, अंबानीही लागू आहे. परंतु, सर्वाधिक जीएसटी सर्वसामान्य जनता भरते. अदानी, अंबानी नाही. दरवर्षी अर्थमंत्री बजेट सादर करतात. जनतेचा पैसा कुठे खर्च केला जावा, याकरिता अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधानांच्या कार्यालयात बसून ९० अधिकारी ठरवितात.मात्र, हा पैसा सर्वसामान्यांच्या सुखसुविधांवर खर्च न करता, करोडपतींचे लाड पुरविले जाते. देशात सगळीकडे खासगीकरण केले जात आहे. युवकांचा रोजगार त्यांच्या हातून काढून घेतला जात आहे. सभेला उपस्थित जनसमुदायाला तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळते का? असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. यावर नाही, असे उत्तर येताच राहुल गांधी यांनी हे सरकार शेतकरी, शेतमजुरांचे नाही. शेतमालाला हमी भाव नाही. युवकांना बेरोजगारांच्या खाईत लोटणारे हे सरकार असल्याचा हल्लाबोल केला..भाषणातील प्रमुख मुद्देजातिनिहीय जनगणना करणारआपणाला करोडपतींचे नाही, तर शेतकरी, शेतमजूर, युवकांचा देश हवाअदानी, अंबानी देशाला रोजगार देत नाहीतसगळीकडे खासगीकरण होत आहेदहा वर्षांत एकाही शेतकऱ्यांचे कर्ज केंद्र सरकारने माफ केले नाहीमी अदानींसोबत हस्तांदोलन केले नाही, मात्र त्यांचे हात मऊ असावेतनरेंद्र मोदी २४ तास स्वतःला ओबीसी म्हणवून घेतातनफरत का ठेका उन्होने लिया है; मोहब्बत का ठेका हम लेंगे.राहुल गांधी म्हणाले....महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना तीन हजार प्रत्येक महिन्याला देऊमहिला व मुलींसाठी मोफत बसप्रवास सुरू करणार२५ लाखांपर्यंत आरोग्य विमा, मोफत औषधी देणारजातिनिहाय जनगणना करणारशेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देणार, नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहन देणारबेरोजगार युवकांना दर महिन्याला चार हजार रुपयांपर्यंत मदत देणार.राहुल गांधी यांनी २८ मिनीटे भाषण केलेसात ते आठ मिनीटे नरेंद्र मोदी यांच्यावर, अदानी, अंबानी यांच्यावर दहा ते बारा मिनीटे, शेतकरी, शेतमजूर, युवकांवर पाच ते सात मिनीटे आणि महाविकास आघाडीने सादर केलेल्या लोकसेवेची पंचसुत्री यावर जवळपास चार मिनीटे भाषण दिले.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.