Gondia: जुन्या वैमनस्यातून युवकाचा खून, आरोपीसह दोन विधीसंघर्ष बालके ताब्यात

Latest Vidarbha News: आरोपी लक्की मेश्राम व विधी संघर्ष बालके यांना गोंदिया शहर पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे
Gondia: जुन्या वैमनस्यातून युवकाचा खून, आरोपीसह दोन विधीसंघर्ष बालके ताब्यात
Updated on

Latest Gondiya News: जुन्या वैमनस्यातून चाकूने वार करून एका युवकाचा खून करण्यात आला. ही घटना छोटा गोंदिया येथे गुरुवारी (ता. २३) रात्री अकराच्या सुमारास घडली. गोंदिया शहर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यातील आरोपीसह दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले आहे. विकास उर्फ विक्की श्रीराम फरकुंडे (वय २९, रा. चिचबन मोहल्ला, छोटा गोंदिया) असे मृताचे नाव आहे.

फिर्यादी श्रीराम बुधराम फरकुंडे (वय ६०, रा. छोटा गोंदिया) यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी शुक्रवारी (ता. २३) पहाटे तीनच्या सुमारास गुन्हा दाखल केला होता.

Gondia: जुन्या वैमनस्यातून युवकाचा खून, आरोपीसह दोन विधीसंघर्ष बालके ताब्यात
Gondia Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पीडिता १९ आठवड्यांची गर्भवती,आरोपीस पोक्सोअंतर्गत अटक

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी खून प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घेऊन तत्काळ जेरबंद करण्याचे निर्देश गोंदिया शहरचे पोलिस निरीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांना दिले होते.

तथापि, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहरचे पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वातील पोलिस पथक अशी विविध पथके सदर खून प्रकरणाचा उलगडा करण्याकरिता नेमण्यात आली होती.

Gondia: जुन्या वैमनस्यातून युवकाचा खून, आरोपीसह दोन विधीसंघर्ष बालके ताब्यात
Gondia : गोंदियातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात आदर्श धाबेटेकडी येथील पोल्ट्री फाॅर्ममध्ये आढळला अजगर

आरोपीतांचा शोध घेत असताना घटनास्थळावरून प्राप्त माहिती व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी लक्की सुनील मेश्राम (वय १८, रा. संजयनगर, गोंदिया) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले दोन साथीदार विधीसंघर्ष बालके यांच्यासह मिळून विकास फरकुंडे याचा जुन्या भांडणाच्या कारणावरून चाकूने खून केल्याचे सांगितले.

त्यामुळे दोन विधीसंघर्ष बालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनीदेखीलजुन्या भांडणाच्या कारणावरून विकासचा खून केल्याचे सांगितले. आरोपी लक्की मेश्राम व विधी संघर्ष बालके यांना गोंदिया शहर पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहेत.

Gondia: जुन्या वैमनस्यातून युवकाचा खून, आरोपीसह दोन विधीसंघर्ष बालके ताब्यात
Gondia Accident : शिरोली महागावजवळील घटना, स्कूल बस-दुचाकीची धडक पतीचा मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.