Gondia Crime News: अल्पवयीन मुलीच्या मारेकऱ्यास जन्मठेप

अल्पवयीन मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या
 killer of minor girl
killer of minor girlsakal
Updated on

रावणवाडी जि. गोंदिया : शिकवणी वर्गाकरिता जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या करणाऱ्या आरोपीस जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा निर्वाळा गुरुवारी ( ता. २२) दिला. दुर्गाप्रसाद रहांगडाले (वय २१, रा. दासगाव) असे आरोपीचे नाव आहे.

यातील अल्पवयीन मुलगी आणि आरोपी दुर्गाप्रसाद रहांगडाले हे एकमेकांना ओळखत होते. नेहमी बोलणेही व्हायचे. यावरून दुर्गाप्रसादला ती आपल्यावर प्रेम करत असल्याचे वाटले. त्याने तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तिने नकार दिला होता. त्यामुळे तो काटा काढण्याच्या बेतात होता.

दरम्यान, २३ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास मुलगी चिरामनटोला येथून कामठामार्गे ट्यूशन क्लासेससाठी सायकलने जात होती. याचवेळी तिच्या मागावर असलेल्या दुर्गाप्रसादने झिलमिलीजवळ तिला अडविले. हातोड्याने वार करून तिची हत्या केली. इतकेच नव्हे, तर त्याने ब्लेडने तिच्या गळ्यावर मारले. तसेच स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शेतात मोटारपंप दुरुस्ती करणाऱ्या लोकांनी पाहताच त्यांनी घटनास्थळ गाठले. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पकडले व रावणवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

तथापि, मुलीच्या काकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. जिल्हा न्यायालयात २८ फेब्रुवारी रोजी प्रकरण दाखल केले. या प्रकरणात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील कृष्णा डी. पारधी व जिल्हा सरकारी वकील महेश एस चंदवानी यांनी एकूण नऊ साक्षदार न्यायालयात सादर केले.

दरम्यान, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ एन. बी. लवटे यांनी आरोपी व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून आरोपी दुर्गाप्रसाद रहांगडाले याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.