Gondiya: पालांदूर जमीदारी जंगलात आढळला वाघाचा मृतदेह, नखांमुळे मृत्यूचं कारण उघड

देवरी तालुक्याच्या पालांदूर जमीदारी येथील जंगलात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आला.
Gondiya
Gondiya Esakal
Updated on

Gondiya Tiger Found Dead: देवरी तालुक्याच्या पालांदूर जमीदारी येथील जंगलात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी वनकर्मचारी जंगलात पेट्रोलिंग करीत असताना ही घटना उघडकीस आली.

वाघ हा वृद्ध असल्याची माहिती असून, वृद्धत्वामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळी कुजलेल्या अवस्थेतीतील वाघाचे सर्व अवयव विखुरलेले होते. नखे शाबूत होती. त्यामुळे शिकारीचा प्रयत्न झाला नसावा, असेही बोलले जाते.

Gondiya
Demonetisation: "नोटबंदी हा काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करण्याचा सर्वात चांगला मार्ग;" सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं मत

दरम्यान, वाघाचे सर्व अवयव एकत्र गोळा करून जागीच दफनविधी करण्यात आला. घटनास्थळी डीएफओ प्रमोदकुमार पंचभाई, एसीएफ योगेंद्र सिंग, मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे, सावन बहेकार व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (Latest Marathi News)

Gondiya
IPL 2024 : टी 20 वर्ल्डकपच्या तोंडावर होणार दमछाक... भारतीय खेळाडूंसाठी नो वर्कलोड मॅनेजमेंट!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.