Amravati Crime : अमरावतीत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखावर गोळीबार! नेमकं काय घडलं?

Firing On Shivsena Leader Gopal Atbat in Amravati Crime : अमरावती येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अमरावती ग्रामीणचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
crime
crime sakal
Updated on

अमरावती येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अमरावती ग्रामीणचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. वलगाव ते दर्यापूर या मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळ अटबट हे मध्यारात्री अमरावतीहून दर्यापूरकडे जात असताना अज्ञातानी इनोव्हा कारवर गोळीबार केला. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.

crime
Laxman Hake Viral Video: हाकेंनी खरंच दारू घेतली होती का? प्राथमिक वैद्यकीय अहवालातून आलं समोर

शिवसेनेचे अमरावती येथील दोन्ही जिल्हाप्रमुख अरुण पडोळे आणि गोपाल अरबट यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. गोळीबार झाल्यानंतर गोपाल अरबट यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. शिंदेच्या शिवसेनेचे अमरावती शहर जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरून गाडीवर गोळीबार झाल्याचे वलगाव पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आलेल्या तक्रारीत अरबट यांनी म्हटले आहे.

पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही, पोलिस तपास झाल्यावरच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

crime
Amruta Fadnavis Video : "ओ मामी बरं झालं तुम्ही..."; 'लाडकी बहीण'च्या प्रचारासाठी अमृता फडणवीसांनी बनवली रील, एकदा पाहाच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.