शेतकऱ्यांसाठी सरकारची तयारी जोमात; पण साठवणूक करणार कुठे?

Government warehouse housefull in Yavatmal district
Government warehouse housefull in Yavatmal district
Updated on

यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू झाला आहे. शासनस्तरावरून खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील केंद्रीय तसेच राज्य वखार महामंडळांच्या गोदामात कापसाच्या गठाणी ठेवल्या आहेत. यामुळे तूर खरेदीच्या हंगामात जागेची अडचण उद्‌भवण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

कापूस, सोयाबीननंतर तूर उत्पादक जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक घेतले जाते. दरवर्षी साधारणतः तुरीची शासकीय खरेदी सात लाख क्विंटलपर्यंत पोहोचते. यामुळेच तूर खरेदीचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी यंदा दुष्काळाचे वर्ष पाहता दोन लाख क्विंटल तूर खरेदीचे नियोजन केले आहे. यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे.

तूर ठेवण्यासाठी चार लाख पोते (बारदाणे) नियोजन करून ठेवण्यात आले आहे. खरेदीच्या दृष्टीने तयारी जोरात असली तरी तूर साठविण्यासाठी प्रशासनासमोर अडचण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. सध्या केंद्रीय वखार महामंडळ तसेच महाराष्ट्र वखार महामंडळ या दोन्ही शासकीय गोदामात मोठ्या प्रमाणात कापसाच्या गठानी ठेवल्या आहेत. यामुळे याठिकाणी जागा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. 

गठानी वाढल्यातर ही जागा ही भरण्याची शक्‍यता आहे. यामुळे आता प्रशासनासमोर जागेची उपलब्धता हा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते. मार्केटिंग फेडरशनकडे असलेले गोदाम पूर्ण रिकामे आहे. यात साधारणतः: तीन हजार मेट्रिक टन माल बसू शकतो. त्या तुलनेत नियोजन झाले आहे. मात्र, तुरीची आवक वाढली तर अडचण निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. पुसद तसेच उमरखेड येथील गोदाम फुल्ल झाले आहेत. वणीमध्ये केवळ शंभर टन माल बसेल एवढीच जागा सध्या शिल्लक आहे. सध्या महागाव, पांढरकवडा, नेर, आर्णी, पुसद, मारेगाव, दारव्हा, बाभूळगाव तसेच दिग्रस या नऊ ठिकाणी नोंदणी केली जात आहे.

चार लाख बारदाण्यांचे नियोजन

जिल्ह्यात यंदा दोन लाख क्विंटल तूर शासकीय खरेदी केंद्रावर येण्याची शक्‍यता आहे. यासाठी चार लाख बारदाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. आतापर्यंत नऊ केंद्रावर 22 हजार 515 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यातील 11 हजार 46 शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली असून, 11 हजार 469 शेतकऱ्यांची नोंदणी करणे सुरू आहे. 

आलेला शेतकरी परत जाणार नाही 
शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून आधी एसएमएस पाठविले जाणार आहे. त्यानुसार केंद्रावर नियोजन केले जाईल. मॅसेज गेल्यानंतर दोन दिवसांची मर्यांदा असली तर आलेला शेतकरी परत जाणार नाही, याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. जागेचा प्रश्‍न असला तरी आमच्याकडे फेडरेशनचे तीन हजार मेट्रिक टन माल बसेल इतकी जागा सध्या आहे. 
- अर्चना माळवी,
प्रभारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.