नक्षलग्रस्त भागांत आता फुलणार हिरवागार भाजीपाला

Bhajipala
Bhajipala
Updated on

गडचिरोली : जिल्ह्यातील तीन चतुर्थांश भूभाग वनव्याप्त आहे. त्यामुळे साहजिकच पीक क्षेत्राखालील जमिनीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. तथापि, सपाट क्षेत्र पाहून जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी जनता वनजमिनीवरील वृक्ष तोडून शेती करीत आहे. परंतु, तंत्रशुद्ध शेती करीत नसल्याने त्यातून उत्पन्नाचे प्रमाणदेखील अत्यल्प असल्याचे दिसून येते. हीच बाब लक्षात घेत पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोली पोलिस दल व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांच्या वतीने भामरागड तालुक्यातील महिला शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक स्त्रोत प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

१३ ते १६ सप्टेंबर या कालावधीत भाजीपाला लागवडीचे नियोजनबद्ध प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे महिलांना विविध फळरोपांवर कलमे करण्याबाबतसुद्धा अवगत करण्यात आले. प्रशिक्षण आटोपल्यानंतर या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिला शेतकऱ्यांचा निरोप समारंभ गुरुवार (ता. १६) पोलिस मुख्यालयातील एकलव्य धाम येथे घेण्यात आला. त्यात ११४ महिला शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, भाजीपाल्याच्या बियाण्यांच्या किट्स, रोप तसेच साड्यांचे वाटप करण्यात आले.

Bhajipala
गरिबीवर मात करीत दोहतरे करतेय स्वप्नांचा जिद्दीने पाठलाग!

कार्यक्रमात पोलिस अधीक्षक अंकित गोयल प्रशिक्षणार्थी महिलांचे कौतुक करताना म्हटले की, भामरागड तालुका छत्तीसगड राज्याचा सीमावर्ती भाग व त्याचा अबुजमाड परिसर म्हणजेच नक्षल्यांचा गड. मात्र, तालुक्यातील महिलांनी कोणतीही भीती मनात न बाळगता भाजीपाला लागवड प्रशिक्षण मेळाव्यास उपस्थिती लावल्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तसेच पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोली पोलिस प्रशासन जनतेच्या दारी पोहचले असून त्याचा फायदा नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

अनेकांना मिळाला रोजगार

गडचिरोली पोलिस प्रशासनाद्वारे आजपर्यंत अनेकांना नोकरी व स्वयंरोजगार मिळाला आहे. पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक ४१३, नर्सिंग असिस्टंट ११११, हॉस्पिटॅलिटी १५२, ऑटोमोबाईल ११० या प्रकारे एकूण १७८६ युवक, युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बीओआय आरसेटी व कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने ब्युटीपॉर्लर ७०, मत्स्यपालन २५, कुक्कुटपालन १२६, शेळीपालन ६७, लेडीज टेलर ३५, फोटोग्राफी ३५, मधुमक्षिका पालन ३२, भाजीपाला लागवड ११४ अशा एकूण ५०४ युवक, युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.