या महामार्गाची आत्मकथा ऐकली काय? होय, मी राज्य महामार्गच, जागोजागी उखडून गेलोय...!वाचा सविस्तर

अर्जुनी मोरगाव : जागोजागी उखडलेला राज्य महामार्ग.
अर्जुनी मोरगाव : जागोजागी उखडलेला राज्य महामार्ग.
Updated on

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : माझी निर्मिती 1985 च्या दरम्यान झाली. खरं म्हणजे मी गोंदिया-भंडारा, गडचिरोली-चंद्रपूर या जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. माझ्या अवस्थेवर मी स्वतः अश्रू ढाळतोय. मी आतापर्यंत अनेक रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचविले आहे. जीवनदानसुद्धा दिले आहे.

माझ्या निर्मितीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झालाय. मात्र, मी आजघडीला जागोजागी उखडून गेलोय. अखेरच्या घटका मोजतो, असे म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. मला गरज आहे ती माझ्या पुनरुज्जीवनाची...ही कथा आहे, राज्य महामार्ग 275 ची...

भंडारा-गोंदिया, चंद्रपूर-गडचिरोली या जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग, अशी माझी ओळख आहे. तत्पूर्वी, माझा जन्म 1985 दरम्यानचा. तसाही मी माझ्या जन्माच्या वेळी खूप खूश होतो. कारण माझी निर्मितीच महान कार्यासाठी झाली आणि महान कार्य करणे कोणाला आवडणार नाही. बरे मलाही माझ्या महान कार्याचा अभिमान आहे. गर्वही आहे. मात्र आता मी फार दुःखी आहे. दुःखाचे कारणही तसेच आहे, आजपर्यंत मी अनेक वाटसरूंना त्यांच्या इच्छितस्थळी सुखरूप पोहोचवून देण्यास मदत केली.

प्रवाशांच्या हाल-अपेष्टा पाहून मला होते दुःख

आता माझ्यावरून येणारे-जाणारे वाटसरू हेलकावे खात, कधी खड्ड्यात पडून, रक्तबंबाळ होऊन घरापर्यंत जातात. त्यामुळे ज्यांना सुखाने आजपर्यंत घरापर्यंत पोहोचविलो. त्यांच्याच वेदना, हाल-अपेष्टा, रक्तबंबाळ शरीर पाहून मला दुःख अनावर होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून माझी फारच दैन्यावस्था झाली आहे. जागोजागी मी उखडून अस्ताव्यस्त पडलो. माझ्यावरची गिट्टी वर आली आहे. माझी ही अवस्था पाहून डिसेंबर 2018 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी सदाफुलीचे झाडे लावून तसेच टायर जाळून आंदोलन केले होते.


मुरमाचा लेप देऊन काय फायदा?

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा धसका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने काही ठिकाणी गिट्टी टाकली. मुरमाचा लेप देऊन माझी डागडुजी केली. मात्र काही दिवसातच माझी अवस्था "जैसे थे' म्हणजेच दयनीय आहे. माझ्यावर फूट ते दीड फुटापर्यंत खोल खड्डे पडले असून, अनेकदा अपघातसुद्धा झाले आहेत. त्यामुळे माझ्या मनाला वेदना होतात आणि त्यामुळेच माझी दुरुस्ती लवकरात लवकर करावी, तेव्हाच सार्थक झाल्यासारखे वाटेल.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.