त्याने आपल्या वाढदिवशी सिरोंचा रस्त्यावर केले असे काही...वाचा सविस्तर

सिरोंचा : वाढदिवसाच्या दिवशी रस्त्यावरचा खड्डा बुजवताना उपेंद्र मुलकला.
सिरोंचा : वाढदिवसाच्या दिवशी रस्त्यावरचा खड्डा बुजवताना उपेंद्र मुलकला.
Updated on

सिरोंचा (जि. गडचिरोली) : अनेकजण आपला वाढदिवस धूमधडाक्‍यात साजरा करतात. मोठा केक, डिजे, मेजवान्यावरच बहुतांश लोकांचा भर असतो. पण, येथील उपेंद्र मुलकला नामक समाजसेवी युवकाने आपल्या वाढदिवसानिमित्त असा कोणताही वायफळ खर्च न करता रस्त्यावरील धोकादायक खड्डा स्वत: बुजवून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. येथील उम्मीद (द होप) फाउंडेशनच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

सिरोंचा येथील मुख्य मार्गावर गणेश मंदिरासमोर मागील 3 ते 4 महिन्यांपासून रस्त्यात मोठा खड्डा पडला होता. पण, या खड्ड्याबद्दल नागरिकांनी अनेकदा माहिती देऊनही संबंधित विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे, या विभागाचे कर्मचारी रोज या मार्गाने ये-जा करत असतात. तरीही या खड्ड्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. या खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्‍यता होती.

उम्मीदने घेतला खड्डा बुजविण्याचा निर्णय

त्यामुळे उम्मीद फाउंडेशनचे सदस्य उपेंद्र मुलकला यांच्या वाढदिवसानिमित्त हा खड्डा बुजविण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला. या उपक्रमात संघटनेचे अध्यक्ष अमितकुमार तिपट्टी यांच्यासह सदस्य अतुल सोनेकर, रोहित गंटे व इतर सदस्यांनी सहभाग घेतला.

संबंधित विभागाने दखल घेतली नाही

आता पावसाचे दिवस असल्याने अनेकदा या रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचत होते. त्यामुळे वाहनचालकांना खड्डा दिसत नव्हता. त्यातून अनेकदा अपघात घडत होते. कित्येक नागरिकांना जखमी व्हावे लागायचे. याबद्दल नागरिकांनी ओरड करूनही त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. अखेर वाढदिवसाच्या निमित्ताने उम्मीद फाउंडेशनने नागरिकांची ही समस्या दूर करत इतरांसाठी एक प्रेरक उदाहरण निर्माण केले आहे.

अशा उपक्रमाची गरज

वाढदिवस, लग्न, बारसे किंवा असे अनेक कार्यक्रम नागरिक साजरे करतात. पण, या सोहळ्यांना सामाजिक उपक्रमाचीही जोड देता येऊ शकते. उम्मीद फाउंडेशनने या उपक्रमाच्या माध्यमातून हाच संदेश दिला आहे. तसेच अशा उपक्रमांची नितांत आवश्‍यकता असल्याचेही संघटनेने सांगितले.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.