अचलपूर (जि. अमरावती) : सततचा पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या सोयाबीनवर (rain affect soybean) आता संकटाचे ढग घोंघावू लागले आहेत. या वातावरणामुळे सोयाबीनवर खोडमाशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गाफील न राहता उपाययोजनांना प्राधान्य देणे आवश्यक झाले आहे. (heavy rain affect soybean in achalpur of amravati)
जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर खोडमाशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्याकरिता कृषी कर्मचाऱ्यांना जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील पावसानंतर सोयाबीनची पेरणी केली, त्या शेतकऱ्यांचे पीक सद्यस्थितीत वीस ते तीस दिवसांचे झाले आहे. त्यामुळे या सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे, तर ज्या शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी केली, अशा सोयाबीन पिकावरसुद्धा पुढील काही दिवसांत या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. सोबतच चक्रीभुंगा किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गाफील न राहता या किडींचे व्यवस्थापन करावे, जेणेकरून सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येणार नाही.
पिकांच्या उपाययोजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका स्तरावरील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वेळीच सोयाबीन पिकावरील किडी ओळखून त्यांचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
एकूण शेतीक्षेत्र : ६ लाख ८८ हजार हेक्टर
सोयाबीन : २ लाख २६ हजार हेक्टर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.