मिताली सेठी ठरल्या ‘प्रकाश’साठी देवदूत; फेसबुकच्या माध्यमाने आदिवासी मुलाला मदत

Helping a tribal child through Facebook at Amravati district
Helping a tribal child through Facebook at Amravati district
Updated on

धारणी (जि. अमरावती) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी एका आदिवासी मुलाला उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांच्या फेसबुकच्या एका हाकेवर देशाच्या कोन्याकोपऱ्यातून मदत झाली आहे. त्यामुळे मिताली सेठी या प्रकाश परते या आदिवासी मुलासाठी देवदूत ठरल्या.

मेळघाटातील रंगुबेली या दुर्गम गावातील एका आदिवासी मुलाला अभ्यासाची आवड. अभ्यास करून मोठा अधिकारी बनण्याचा या मुलाचे स्वप्न. त्या मुलाला युपीएससीची परीक्षा देण्याची इच्छा होती. त्यासाठी तो जमेल त्या प्रकारे परीक्षेची तयारी करण्यासाठी नोट्‌स व पुस्तके जमा करीत आहे. तेवढ्यात साधनात तो विद्यार्थी तयारी करीत होता. पण, स्वप्न पूर्ण कसे करायचे? कशा प्रकारे अभ्यास करायचा?, मोठा अधिकारी बनण्यासाठी या मुलाला अनेक मोठ्या अडचणी येत होत्या.

परीक्षेसाठी कशी तयारी करावी? कोणती पुस्तके वाचावी? कोण कोणता अभ्यासक्रम आहे? अभ्यास कसा करावा? या कुठल्याही प्रकारची या मुलाला माहिती नव्हती. पण दृढ निश्‍चय असलेल्या या मुलावर नजर पडली उपजिल्हा अधिकारी मिताली सेठी यांची. मिताली सेठी या रांगुबेली या गावाच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी ग्रामपंचायतच्या टेबलवर काही पुस्तके पाहिली. त्यांनी ती वाचली व त्या एकदम आश्‍चर्यचकित झाल्या. ती पुस्तके होती युपीएससीच्या नोट्‌स होती.

व्यवस्थित वर्गीकृत व नियोजितपणे तयार केलेली होती. श्रीमती सेठी यांनी विचारपूस केली. या कुणाच्या नोट्‌स आहेत? असा सवाल त्यांनी केला. उपस्थित लोकांनी सांगितले गावातील मुलगा आहे. त्याचा नाव प्रकाश परते आहे. त्याची इच्छा आहे स्पर्धापरीक्षा देण्याची. त्याची पुस्तके आहेत.

हे पाहून उपजिल्हाधिकारी श्रीमती सेठी यांना आनंदाचा धक्का बसला. त्यांनी त्या मुलाची भेट घेतली. त्याच्याजवळ असलेल्या संपूर्ण नोट्‌सची माहिती घेतली. त्या मुलाला यूपीएससीच्या परीक्षा विषयी माहिती दिली. अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले. तसेच अभ्यासासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी एक फेसबूक पोस्ट केली.

त्यांनी रंगुबेली अतिदुर्गम गावाविषयी माहिती दिली व तसेच या गावातील एका आदिवासी विद्यार्थी आत्मविश्वासाने भरलेला आहे. त्याच्यासाठी पुस्तकांसाठी मदतीची विनंती मिताली सेठी यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमाने केली व विद्यार्थ्याला लागणारे जवळपास अकरा पुस्तकांची नावे त्यांनी पोस्टमध्ये टाकली. बघता बघता एक दोन दिवसात अनेकांनी देशभरातून या विद्यार्थ्यांसाठी स्वखुशीने पुस्तके तसेच अभ्यासासाठी लागणारे सर्व नोट्‌स देण्याची इच्छा कमेंट बॉक्‍समध्ये जाहीर केली.

या विद्यार्थ्याला एका दोन दिवसात सगळे पुस्तके उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमाने मिळाली. देवदूत म्हणून मिताली सेठी यांनी प्रकाशच्या जीवनात प्रकाश टाकण्याच्या प्रयत्न केला. सध्या प्रकाश हा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. पुढच्या वर्षी होणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा प्रकाश देणार आहे.

तो निश्‍चितच ही परीक्षा उत्तीर्ण होईल
मेळघाटच्या मुलांमध्ये टॅलेंटची कमी नाही. त्यांना फक्त मार्गदर्शनाची आवश्‍यकता आहे. प्रकाश परते हा विद्यार्थी स्वतः नोट्‌स तयार करून आयएएसची तयारी करीत आहे. त्याला मदतीचा हात दिला तर तो निश्‍चितच ही परीक्षा उत्तीर्ण होईल.
- डॉ. मिताली सेठी,
प्रकल्प अधिकारी

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.