Hinganghat Burning Case : आरोपी विकेश नगराळे दोषी

Hinganghat Burning Case Result
Hinganghat Burning Case Resulte sakal
Updated on

वर्धा : वर्ध्यातील हिंगणाघाट येथे दोन वर्षांपूर्वी भरचौकात प्राध्यापिका तरुणीला (Hinganghat Burning Case) जाळण्यात आले होते. त्यानंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी आज हिंगणाघाट सत्र न्यायालयानं (Hinganghat Session Court) आरोपी विकेश नगराळेला दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी उद्या निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली.

Hinganghat Burning Case Result
हिंगणघाट जळीतकांड: बचाव पक्षाचे वकील पुन्हा गैरहजर; उलट तपासणीचे कार्य अपूर्णच

अंकिता पिसुड्डे असं प्राध्यापिका तरुणीचं नाव होतं. ती 3 फेब्रुवारी २०२० रोजी सकाळीच महाविद्यालयात जाण्यासाठी गाववरून हिंगणघाटला पोहोचली. पण, आरोपी विकेश नगराळे काळ बनून तिची वाट पाहत होता याची तिला माहिती नव्हती. त्यानं भरचौकात पेट्रोल टाकून अंकिताला जाळलं. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आलं. पण, अवघ्या सात दिवसांत तिची मृत्यूशी झुंज संपली. आरोपी विकेश नगराळे याने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केलं होतं. एकुलती एक मुलगी गमावल्याने आई-वडिलांना चांगलाच धक्का बसला होता. अजूनही ते या धक्क्यातून सावरू शकले नाहीत.

उद्या निकाल - उज्वल निकम

न्यायालयानं आरोपी विकेश नगराळेला खुनी घोषित केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जेव्हा आरोपीला दोषी ठरवले जाते तेव्हा त्याला कुठली शिक्षा द्यावी यासाठी एक दिवसाची मुदत दिली जाते. आरोपीला शिक्षा कोणती हवी आणि सरकारी पक्षाला कोणती शिक्षा हवी, याबाबत उद्या तक्त दाखल करू. त्यानंतर न्यायालय निकाल घोषित करणार आहे, असं उज्वल निकम म्हणाले.

या प्रकरणाचा निकाल लवकर लागावा यासाठी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली होती. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्यासाठी परवानगी दिली. तसेच अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. आरोपी विकेश नगराळेविरोधात तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केलं होतं. या प्रकरणात आतापर्यंत 29 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या प्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तीवाद संपला होता. आता न्यायालयानं निकाल राखून ठेवला असून उद्या घोषित करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()