हिरकणी उद्योग समूहाकडून महिलांना लाखोंचा गंडा

वाशीम जिल्ह्यातील महिलांची ३७ लाखांनी फसवणूक
Fraud crime news
Fraud crime newsesakal
Updated on

रिसोड : हिरकणी व्यवसाय प्रशिक्षण व महिला उद्योग समूहाच्या नावाखाली संपूर्ण राज्यातून महिलांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक करून कंपनीने पोबारा केला आहे. या कंपनीने वाशीम जिल्ह्यातील महिलांची ३७ लाखाने फसवणूक केली आहे कंपनीमध्ये काम करणाऱ्या तालुका समन्वयक व जिल्हा समन्वयक यांनी शेकडो महिला सह आमची फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक वाशीम यांच्याकडे २९ ऑगस्ट २०२२ रोजी केली आहे.

हिरकणी व्यवसाय प्रशिक्षण व महिला उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या नावाने फलटण जिल्हा सातारा येथे मुख्य कार्यालय आहे याच कंपनीने मागील काही दिवसापूर्वी नागपूर येथे विभागीय कार्यालय उघडून तालुका समन्वयक व जिल्हा समन्वयक यांना हाताशी धरून इतर जिल्ह्यासह वाशीम जिल्ह्यातही आपले जाळे पसरविले. महिलांकडून रोजगार व प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली प्रत्येक महिलांकडून ६२० रुपये शुल्क गोळा केले. अनेक स्वंयसेवी सामाजिक संस्था उद्यमी संस्थेचे सर्वसाधारण रजिस्ट्रेशन किंवा शॉप ॲक्ट लायसन्स काढून व्यवसाय प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली व्यापक जाळे उभे केले तसेच महिलांना गृह उद्योग उपलब्ध करून देण्याची आमिष दाखवले. या संस्थेने जिल्हास्तरावर जिल्हा समन्वयक व तालुका समन्वयक यांची पंधरा ते पंचवीस हजार मासिक वेतन देऊन नियुक्ती केली.

महिला सभासदांची संख्या जास्त व्हावी या हेतूने सभासद नोंदणीनुसार कमिशन देण्याचे ठरले. त्यामुळे यांच्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षणासाठी तालुक्यात त तसेच जिल्ह्यामध्ये महिलांचे मोठे जाळे उभारण्यात आले आणि त्यांच्याकडून प्रत्येकी सहाशे वीस रुपये प्रमाणे प्रशिक्षण शुल्क म्हणून वसूल करण्यात आले. या माध्यमातून वाशीम जिल्ह्यांमधून महिलांची लाखो रुपयाची फसवणूक करण्यात आली या कंपनीने नागपूर जिल्ह्यातील रमण चांडकनगर मूर्तीरोड रेल्वे क्रॉसिंग जवळ धंतोली काटोल येथे विभागीय कार्यालय सुरू केले. जिल्हा समन्वयकांना हाताशी धरून विदर्भासह वाशीम जिल्ह्यातही कंपनीने आपले जाळे पसरवले व महिलांची लाखो रुपयांनी फसवणूक केली.

तालुका व जिल्हा समन्वयक यांनी सर्व पैसे कंपनीला पाठविले काही महिलांकडे निरमा पावडर पॅकिंग करिता पाठविली २५ ग्राम पॅकिंग झालेली पावडर नेण्यात आली नाही तसेच महिलांना कोणतेही मानधन देण्यात आले नाही. जिल्हा समन्वयक यांनी कंपनीचे अध्यक्ष सोनिक हरिदास गाडेकर राहणार निंबळक तालुका फलटण जिल्हा सातारा यांना वारंवार फोन करून पैशाची मागणी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली यावरून महिलासह आपली फसवणूक झाल्याचे समन्वयकांच्या लक्षात आले. त्यातच शेकडो महिलांनी ६२० रुपये परत मागण्याचा तगादा लावल्यामुळे देवानंद प्रल्हाद खाडे तालुका समन्वयक मंगरूळपीर यांनी इतर सर्व प्रतिनिधीसह सोनिक हरिदास गाडेकर अध्यक्ष प्रकल्प संयोजक राहणार निंबळक तालुका फलटण जिल्हा सातारा, दीपक नामदेव चव्हाण चेअरमन राहणार पिपरद ता. जि सातारा हिरकणी महिला उद्योग समूह यांच्या विरोधात वाशीम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणांमध्ये मालेगाव येथील लक्ष्मण गुडदे या व्यक्तीचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.