ऐतिहासिक किल्ल्याला "अस्वच्छतेची तटबंदी'

छायाचित्र
छायाचित्र
Updated on

गुमगाव : हिंगणा तालुक्‍यातील सर्वांत मोठ्या गावात गणना होणाऱ्या गुमगाव या गावाला भोसलेकालीन ऐतिहासिक दगडी तटबंदीचे वैभव प्राप्त झालेले आहे. भोसलेकालीन वास्तूचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या ऐतिहासिक तटबंदीला उरलेले आणि कुजलेले अन्न, जागोजागी पडलेले प्लास्टिक, अस्वच्छता आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे अवकळा आलेली आहे. स्थानिक प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हा ऐतिहासिक वारसा लवकरच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

महाराष्ट्रासारखा ज्वलंत इतिहास व ऐतिहासिक वारसा क्वचितच कुठल्या राज्याला लाभला असेल. नागपूरचे राजे रघुजी भोसले यांनी त्यांच्या राजवटीतील 300 ते 400 वर्षे जुने वैभव आजही डौलाने उभे आहे. गुमगावच्या वेणा नदीच्या पुरापासून तसेच नदीच्या पाण्यापासून गावाचे रक्षण होण्यासाठी काळ्या आणि मोठ्या दगडांची तटबंदी बांधण्याचे काम सुरू केले. एका बाजूला तटबंदी बांधण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काही कारणास्तव दुसऱ्या बाजूच्या तटबंदीचे काम होऊ शकले नाही. परंतु, या तटबंदीच्या परिसरात राजांनी गणपतीचे आणि शंकराचे मंदिर बांधले. शिव अभिषेक करण्यासाठी नदीतून पाणी आणण्यासाठी तिथे पायऱ्या बनविल्या. आज या तटबंदीलाच गावातील लोक "किल्ला' म्हणून ओळखतात. सध्या या किल्ल्याच्या आजूबाजूला कचऱ्याचे साम्राज्य आहे. शिव अभिषेक करण्यासाठी नदीचे पाणी आणण्याचा मार्गही बंद करण्यात आला. ऐतिहासिक किल्लयाला अस्वच्छेतची तटबंदी आल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
किल्ला नव्हे, "डम्पिंग स्पॉट'
तटबंदीच्या परिसरात संत जागेश्वर महाराज सभागृह बांधण्यात आलेले आहे. सभागृहात लग्न समारंभ, वाढदिवस, इतर समारंभ मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. कार्यक्रमाप्रसंगी होणाऱ्या जेवणाच्या कार्यक्रमानंतर भांडे घासून उष्ठे आणि उरलेले अन्न, प्लास्टिक, पात्रावळी आणि इतर कचरा तटबंदीच्या परिसरात टाकल्या जातो. किल्ल्याला लागूनच ग्रामपंचायत कार्यालय असूनही आजूबाजूला नजर टाकल्यास हे ऐतिहासिक स्थळ आहे की, "डम्पिंग स्पॉट' अशी शंका इतिहासप्रेमी आणि कालाप्रेमींच्या डोक्‍यात आल्याशिवाय राहत4त नाही. किल्ल्याला आलेली "अस्वच्छतेची तटबंदी' बघून स्थानिक लोकप्रतिनिधींचे उदासीन आणि निष्क्रिय धोरण निदर्शनात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.