शंभो हरहरचा गुंजतो येथे नाद! जाणून घ्या आमनेरच्या सोमेश्‍वर मंदिराचा इतिहास

aamner
aamner
Updated on

वरुड (जि. अमरावती) : श्रावण महिना आला की वातावरणात शिवभक्तीचा सुगंध दरवळू लागतो. दर श्रावण सोमवारी गावागावातील शिवमंदिरांमध्ये महादेवाला फुलांची सेज केली जाते. बेल अर्पण केला जातो. दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागतात.

वरुड तालुक्‍यातील आमनेर येथील किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले ऐतिहासिक सोमेश्‍वर मंदिर शिवभक्तांचे श्रद्धास्थान असून वर्षभर भक्तांच्या मांदियाळीने फुलून गेले असते. श्रावण सोमवार, महाशिवरात्री, वसंतपंचमीला याठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोमेश्‍वर देवालयासंबंधी अनेक आख्यायिका आहेत. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या जागृत सोमेश्‍वराच्या मंदिराचा इतिहासात उल्लेख दिसून येतो.

वर्धा व जाम नदीच्या संगमावर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या किल्ला परिसरातील जागृत सोमेश्‍वर देवस्थान हे या भागातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. या किल्ल्याचा परिसर २४ एकरांचा असून या किल्ल्यात आठ बुरुज आहेत. किल्ल्याच्या सभोवताल शत्रू एकदम वार करू नये म्हणून खंदक खोदलेला आहे. या किल्ल्याची निर्मिती इ.स. ४०० च्या सुमारास वाकाटक राजांनी केल्याचे अवशेषावरून कळते.

इ.स. १७३८ मध्ये पहिले राजे रघुजी महाराज यांनी हे राज्य जिंकल्यानंतर येथे मराठी राजवट आली. नंतर या परिसरात शेतीची लागवड झाली. शिक्षणाला सुरुवात झाली.
येथील सोमेश्‍वर मंदिरातील शिवलिंग हे काळ्या गुळगुळीत पाषाणाचे असून चिमाजी आप्पा भोसले यांनी खास नेपाळवरून बोलावल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

सविस्तर वाचा - Video : श्रावण सोमवार; जमिनीच्या पातळीवर नंदी तर पंचमुखी शिवलिंग दहा फूट खोलात, वाचा अनोख्या मंदिराबद्दल...

या प्राचीन सोमेश्‍वर देवस्थानाचा जीर्णोद्धार १९ फेब्रुवारी १९७० रोजी बाबासाहेब देशमुख (मुक्तापूर) यांच्या पुढाकाराने भानपूर पीठाचे जगद्‌गुरू शंकराचार्य स्वामी सत्यमित्रानंद यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ही भूमी संत अच्युत महाराज, संत पाचलेगावकर महाराज व संत भाकरे महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. या परिसराला निसर्गाचे उत्तम देणे लाभले आहे. या देवस्थानचा योजनाबद्ध विकास करण्यासाठी या देवस्थानचे अध्यक्ष व सर्व विश्‍वस्त प्रयत्नशील आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()