महिला सायकलपटूंनी रचला इतिहासl; ४० तासांत ६०० किलोमीटरची राईड

अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा
History made by women cyclists 600 km ride in 40 hours amravati
History made by women cyclists 600 km ride in 40 hours amravatisakal
Updated on

अमरावती : अमरावतीच्या तीन महिला सायकलपटूंनी केवळ ४० तासांत ६०० किमी अंतर पार केल्याने त्या अमरावतीच्या सुपर महिला ठरल्या आहेत. पुसला ते सावनेर या मार्गामध्ये घाट आणि जंगल, अशा आव्हानांना पार करीत हा टप्पा त्यांनी पार केला. ही मोठी उपलब्धी मानली जात असून अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. सोनी मोटवानी, अंजली देशमुख व अमिता देशपांडे, अशी या सायकलपटूंची नावे आहेत. सायकलिंग हा केवळ पुरुषांचा प्रांत नाही, तर महिलासुद्धा धाडस दाखवून यशस्वी होऊ शकतात, हे या महिलांनी दाखवून दिले. वाशीम क्लबद्वारे ६०० किमी राइडचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ४० तासांमध्ये ६०० किमी अंतर हे सर्व नियम व अटींचे पालन करून पूर्ण करायचे होते.

हे अतिशय कठीण आव्हान सायकलपटूंनी स्वीकारले. यामध्ये अमरावती असोसिएशनचे ११ सायकल रायडर सहभागी झाले होते. ज्यामध्ये तीन महिला सायकलस्वार सुद्धा होत्या. सोनी मोटवानी, अंजली देशमुख व अमिता देशपांडे यांचा त्यात समावेश होता. स्पर्धेचा मार्ग हा वाशीम, कारंजा, अमरावती, वरुड मार्गे सावनेर आणि त्याच मार्गाने परत असा होता. या यशामागे अमरावती असोसिएशनद्वारे रोज नियमितपणे सर्व मिळून सराव केला जातो, हे मुख्य गमक आहे. यामध्ये कुटुंबातील व्यक्तींच्या सहकार्यामुळे आणि सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आज अमरावतीमधील महिला रायडरनी देखील इतिहास रचला.सोनी मोटवानी, अंजली देशमुख, संतोष काकडे, विजय धुर्वे, पंकज सरकटे, अर्णव हिवराळे, चेतन घोरपडे यांनी एक वर्षात २०० पासून तर ६०० किलोमीटरच्या राइड पूर्ण करून ऑडेक्स क्लब फ्रान्स या संस्थेकडून एसआर सुपर रॅनडोनिअर हा बहुमान प्राप्त केला आहे. या स्पर्धेत सहभागी व्यक्तींमध्ये वरील रायडर्स व्यतिरिक्त अमरावती येथील आशिष बोरकर, अमिता देशपांडे यांनीसुद्धा ६०० किमीची राइड यशस्वीपणे पूर्ण केली. त्यांच्या यशामुळे अमरावती सायकलिंग असोसिएशनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

निसर्गाशी जोडल्या जाण्याचा अनुभव

सायकलिंग करताना आपण निसर्गाशी जोडल्या जातो. पक्ष्यांचे आवाज, मोकळी हवा मिळत असल्याने त्याचा आरोग्याला फायदा होतो. एक वेगळीच ऊर्जा मिळते. ६०० किलोमीटरच्या राइडचा अनुभव अतिशय चित्तथरारक होता. सतत ३८ तास सायकलिंग करून हे आव्हान मी पार केले, असे अमिता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.