गृहरक्षकदल जवानांना पावले गणराया : थकलेल्या मानधनाचा निधी मिळाला

राज्यातील सर्वच जिल्ह्यांकडून ४९ कोटी ८० लाख ९२ हजार रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे.
homeguard
homeguardsakal
Updated on

नागपूर : पोलिसांच्या खांद्याला खादा लावून काम करणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांच्या थकलेल्या मानधनासाठी राज्य शासनाने ५५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांकडून ४९ कोटी ८० लाख ९२ हजार रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे. प्रलंबित देयके तयार करून पाठविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

होमगार्डचे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून पगार झाले नसल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रकाशित होताच शासनाने तातडीने त्याची दखल घेऊ निधी मंजूर केला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात कर्तव्यावर तत्पर असलेल्या होमगार्डसच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. मार्च महिन्यापासून राज्यातील ४० हजार होमगार्ड जवानांना पगारच मिळालेले नव्हते. रस्त्यावरील रहदारी सांभाळण्याची जबाबदारी असो किंवा पाऊस, उत्सव, निवडणूक, अधिवेशन आणि आंदोलनात पोलिसांच्या मदतीसाठी उभे राहणारे होमगार्ड्स आता स्वतःच्या हक्काच्या वेतनाच्या प्रतिक्षेत होते.

homeguard
अंबरनाथला : गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा

ऑगस्ट २०१९ पासून होमगार्डसच्या पगारात वाढ करण्यात आलेली आहे. यापूर्वी त्यांना प्रतिदिन ३०० रुपये मानधन देण्यात येत होते. ते आता वाढवून ६७० करण्यात आले आहे. होमगार्डचे वेतन देण्यासाठी सरकारकडून प्रतिवर्षी १४०.५५ कोटी द्यावे लागणार आहेत. त्यातील ५५ कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहेत.

त्यात नागपूर जिल्ह्यासाठी १ कोटी ५२ लाख ३३ हजार रुपये निधी मिळाला आहे. ५५ कोटी निधीपैकी सध्या ५ कोटी १९ लाख रुपयाचा निधी कोशागारात ठेवण्यात आलेला आहे.

त्यातूनही प्रलंबित देयके देण्यात येणार असल्याचे राज्याचे होमगार्ड सहायक संचालकांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

जिल्हा मिळालेला निधी

  • नागपूर १ कोटी ५२ लाख ३३ हजार ७१० रुपये

  • अमरावती २ कोटी ७४ लाख ३६ हजार ५०० रुपये

  • वाशीम ७३ लाख ६६ हजार ६५० रुपये

  • यवतमाळ १ कोटी ८७ लाख ७५ हजार २६० रुपये

  • बुलडाणा १ कोटी ५ लाख ६५ हजार ९०० रुपये

  • अकोला १ कोटी ५७ लाख ४३ हजार ६६० रुपये

  • गडचिरोली ७८ लाख ३३ हजार ६४० रुपये

  • चंद्रपूर ६९ लाख ८२ हजार ४२० रुपये

  • भंडारा ६६ लाख २१ हजार ६६० रुपये

  • वर्धा १ कोटी ३४ लाख ५० हजार २५० रुपये

  • गोंदिया ६२ लाख ७९ हजार ४९९ रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()