House Tax : घरकर वाढीमुळे खिशाला लागणार झळा; नागरिकांची वाढली नाराजी

नरखेड तालुकयातील जलालखेडा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. जलालखेडा ग्रामपंचायत प्रशासनाने ३० टक्के घरकर वाढवण्याचा ठराव ग्राम घेतला आहे.
house tax
house taxsakal
Updated on

जलालखेडा - नरखेड तालुकयातील जलालखेडा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. जलालखेडा ग्रामपंचायत प्रशासनाने ३० टक्के घरकर वाढवण्याचा ठराव ग्राम घेतला आहे. विशेष म्हणजे ठराव घेतेवेळी सर्व सदस्य उपस्थित नसल्याचे सांगण्यात येत आहे. घेतलेला ठराव मंजुरीसाठी शासन स्तरावर पाठवण्यात आला आहे. ३० टक्के घर करात वाढ करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे नागरिक म्हणत आहेत.

३० टक्के घरकर वाढ केल्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घर करात वाढ होणार आहे. नागरिकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे घरकर वाढ करू नये, अशी नागरिकांची मागणी आहे. करवाढ करायची असल्यास ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे, अशीसुद्धा मागणी गावकरी करीत आहेत. करवाढ केल्यास ग्रामपंचायतचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

ग्रामपंचायतीला सध्या घर करातून १३ लाख ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न ग्रामपंचायतला मिळत असून ३० टक्के करवाढ झाल्यास ते उत्पन्न १७ लाख ८७ हजार ५०० रुपये इतके होणार आहे. घरकर वाढ करताना ‘रेडी रेकनर’चा दर व मागील करावर ३० टक्के करवाढ यापैकी ज्यामुळे कमी करवाढ होत असेल, त्यानुसार करवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी बाबाराव गोरे यांनी सांगितले.

तसेच करवाढ केल्यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढेल, असे सुद्धा त्यांनी सांगितले. करवाढीचा मोठा आर्थिक भूर्दंड गावकऱ्यांवर बसणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयात घरकर वाढीबाबतचा नोटीस व याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायतीने नागरिकांना हरकत असल्यास अर्ज मागविले आहेत. यादी पाहिल्यानंतर काही नागरिकांनी करवाढीत दुजाभाव झाला असल्याचा आरोप केला आहे. करवाढ ही नियमानुसार असल्याचे ग्रामविकास अधिकारी बाबाराव गोरे यांनी सांगितले.

दर ४ वर्षांनी घर कर वाढवण्याचा नियम असून नियमानुसार घरकर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमानुसार रेडी रेकनर दरानुसार किंवा जुन्या करावर ३० टक्के कर वाढवता येतो. रेडी रेकनर दरानुसार कर आकारणी केली तर करात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असती म्हणून जुन्या करावर ३० टक्के करवाढीचा ठराव घेण्यात आला आहे.

- बाबाराव गोरे, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत जलालखेडा

घरकर वाढीला सर्व सदस्यांची समंती असेल तर घरकर वाढ करण्यास माझी हरकत नाही.

- कैलास नीकोसे, सरपंच, ग्रामपंचायत जलालखेडा

ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांचा कसलाही विचार न करता घरकर वाढवण्याचा ठराव घेतला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची परिस्थिती बिकट असून इतक्या मोठ्या प्रमाणात घरकर भरणे त्यांना कठीण होईल. त्यामुळे ग्रामपंचायतीने घर करवाढ करू नये.

- कुलदीप हिवरकर, गावकरी, जलालखेडा

होणारी करवाढ मान्य नसून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे करवाढ करू नये. कर वाढीचा निर्णय ग्राम सभेत घेन्यात यावा. ग्रामसभा न घेता करवाढ केल्यास आंदोलन करण्यात येईल.

- अतुल पेठे, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com