किनगावराजा : येथुन जवळच असलेल्या वर्दडी बु येथिल रहिवासी ज्ञानेश्वर वामन आटोळे यांची कन्या गंगासागर ज्ञानेश्वर आटोळे हिची अकोला जिल्हा पोलिस कॉन्स्टेबल पदी निवड झाली. तीने जिल्ह्यात महिला गटात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी आपल्या लेकीचा नागरी सत्कार करुन कौतुक केले आहे.
जिद्द व चिकाटी सोबतच मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखरापर्यंत पोहचता येते याचे जिवंत उदाहरण म्हणजे गंगासागर आटोळे हिचा सहा वर्षांपूर्वी विवाह रामेश्वर बारहाते (शेवगा ता. अंबड जि. जालना)यांच्याशी झाला. या दांपत्याला एक वर्षाचा मुल़गा आहे .मात्र गंगासागर हिच्या मनाशी कायम खाकी वर्दी बद्दल आवड आणि पोलिस होण्याची मनात क्रेझ त्यामुळे विवाहित असल्याचे पोलिस भर्तीची तयारी सुरु ठेवली.
अकोला येथे निघालेल्या भरतीसाठी २०२१ साली जाहिरात प्रसिद्ध होताच खुल्या प्रवर्गासाठी अर्ज दाखल केला. मार्च २०२३ मध्ये भरती प्रक्रिया पूर्ण केली. परीक्षा दिली याबाबत १५ एप्रिल २०२३ रोजी निकाल जाहीर झाले. त्यामध्ये १५० पैकी १२७ मार्क घेऊन महिला गटात प्रथम क्रमांक मिळवुन महिला पोलिस कॉन्स्टेबलपदी यश संपादन केले. याबद्दल या दाम्पत्याचा वर्दडी गावात नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काकडे, सरपंच मधुकर इनकर, उपसरपंच अनुसया म्हस्के, माजी सरपंच रामदास काकडे, ग्रामपंचायत सदस्यांसह मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत व सुत्र संचालन जनार्दन आटोळे यांनी केले.
गावातील पहिली महिला पोलिस ही गावकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आई वडीलांनी आपले पाल्य देशसेवेसाठी पाठवावे.
रामदास काकडे,माजी सरपंच ,उद्योजक, वर्दडी बु
जिजाऊंच्या तालुक्यात सावित्रींच्या व जिजाऊंच्या लेकींनी अशी पावलं उचलेली समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. याचाच आदर्श गावातील अजुन काही मुली घेतील अशी अपेक्षा आहे.
पुष्पाताई काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.