यवतमाळ : वाकान-पोखरी-माळहिवरा या नऊ किलोमीटरच्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption)झाला असून या रस्त्यासाठी आलेल्या अडीच कोटीचा निधी वरच कंत्राटदाराने डल्ला मारला आहे. त्यामुळे झालेला डांबर रोड हा आठवड्याभरातच उखडून चालला आहे. या रस्त्यावरून जात असलेल्या वाकान येथील जागृक नागरिक अविनाश राठोड याने या रस्त्याची पोल-खोल उघड केली असून जिल्हाधिकारी यांच्याकडेही संबंधित कंत्राटदाराची तक्रार केली आहे. या संपूर्ण रस्त्याच्या चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.
पुसद विधानसभा मतदारसंघातील पाखरी माळहिवरा वाकान या रस्त्यासाठी अडीच कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे या मंजूर निधीतून 9 किलोमीटरचा रस्ताही तयार करण्यात आला मात्र या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने दुसऱ्या दिवशी पासूनच हा रस्ता उखाण्यात सुरुवात झाली या रस्त्याचे काम राजकीय पाठबळामुळे कंत्राटदाराला मिळाले आहेत या संपूर्ण प्रकरणात अधीक्षक अभियंता संबंधित अभियंते व इतर राजकीय पदाधिकारी यांनी या कंत्राटदाराला दिल्याचे बोलल्या जात आहे.(Vidarbha news)
ज्या रस्त्यासाठी वीसवर्षापासून वाट पाहत होतो. तो रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला. आणि यानंतर आता दहा वर्ष हा रस्ता होणार नसल्याचे जागृक नागरिक अविनाश राठोड यांनी सांगितले. त्यामुळे शासनाच्या पैशाचा अपव्यय हे अभियंता व कंत्राटदार करीत असल्याने सर्वांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात यावे. संबंधित कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून चौकशी करण्यात यावी अशीही मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनिष जाधव यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली आहे.(Crime news)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.