अमरावती : नागपूर ते दिल्ली-लेहपर्यंतच 9 हजार 89 रुपयांमध्ये विमान तिकीट (Plane ticket) घेतले. परंतु सेवा रद्द झाल्यानंतर एका तोतयाने प्रवाशाच्या बँक खात्यामधून तब्बल 49 हजार 999 रुपये परस्पर हडपून फसवणूक केली. (In Amravati, a man has swindled Rs 50 thousand from a passenger's bank account)
विजय सुरेश बांबल (वय 26, रा. बाभळी) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यांनी काही महिन्यापूर्वी मित्राच्या नावाने जिओ आयबीबो यावरून नागपूर ते दिल्ली व दिल्ली ते लेह असे विमान प्रवासाचे तिकीट 9 हजार 89 रुपयांमध्ये बुक केले होते. परंतु लॉकडाउन काळामध्ये विमानसेवाच रद्द झाली. त्यामुळे विमान तिकिटाची रक्कम परत मिळविण्यासाठी विजय याने जिओ आयबीबोकडे विनंती केली होती. परंतु पैसे परत आले नाही. अचानक 10 जून 2021 रोजी सकाळी 11 च्या सुमारास हिंदीभाषिक व्यक्तीचा विजय बांबल यांना फोन आला. जिओ आयबीबो कंपनीमधून बोलत असल्याची बतावणी त्याने केली.
विजय यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ट्रॅव्हल डॉट कॉम यावर मेल करण्यात आला व टीम विव्हर कुईक सपोर्ट हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. विजय बांबल यांनी हे दोन्ही अॅप डाऊनलोड केले. त्यानंतर तोतयाने एटीएम नंबर कोड वापरून आधी 1 रुपया पाठविला. त्यानंतर तोतयाने विजय यांच्या बँकखात्यातुन 49 हजार 999 रुपयांची रक्कम परस्पर हडपून फसवणूक केली. दर्यापूर पोलिसांनी विजय बांबल यांच्या तक्रारीवरून तोतया विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. (In Amravati, a man has swindled Rs 50 thousand from a passenger's bank account)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.