धक्कादायक! साथ जी नही सकते, साथ मर तो सकते है ना, असे म्हणतं त्यांनी...

crime scene.jpg
crime scene.jpg
Updated on

लोणार (जि.बुलडाणा) : साथ जी नही सकते...साथ मर तो सकते है ना.. असा प्रेमाचा वादा करत अल्पवयीन युवतीसह तिच्या प्रियकराने लोणार तालुक्यातील अजिसपूर येथे आत्महत्या केल्याची घटना (ता.7) सकाळी उघडकीस आली. यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून, पोलिस याप्रकरणात अधिक तपास करीत आहे.

ऐन तारुण्यात आल्यानंतर लळा लागतो तो प्रेमाचा. आजच्या डिजिटल युगाचा वाढता प्रभाव आणि मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हक्काची व्यक्तीचा शोध यामुळे शहरापर्यंत असलेल्या प्रेमप्रकरणाचे अंकुर आता ग्रामीण भागातही फुटू लागले आहे. परंतु, याला कुटुंबीयांचा विरोध आणि सामाजिकतेची भीती पोटी प्रेमाचे स्वप्न रंगवीत असलेल्यांना पळून जाण्यावर तर कधी आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारावा लागतो.

अशीच घटना लोणार लोणार तालुक्यातील अजिसपुर येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या प्रेमीबरोबर घरातून पळून जाऊन दोघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना 7 मे च्या सकाळी उघडकीस आली. याबाबत लोणार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अजिसपुर येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी 6 मे ला राहत्या घरातून पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावाजवळील हापशीवर हंडा घेऊन गेली असता गावातीलच 23 वर्षीय सचिन मधुकर साळवे या युवकाने तिचा हात धरून तिला त्याच्या सोबत नेले. अशा प्रकारची तक्रार मुलीच्या वडिलांनी लोणार पोलिसात दिली. त्यावरून सचिन मधुकर साळवे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामध्ये गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा गावात होती.

प्रेमाच्या आणाभाका घेत जिना मरणा साथ साथ अशा शपथा या दोघांनी घेतल्या होत्या. परंतु, या प्रेमप्रकरणाला कुंटुंबाचा विरोध असल्याचे या दोघांच्या लक्षात येताच व मुलीचे वय कमी असल्याने या दोघांनी साथ जियेगे साथ मरेगे या उक्तीप्रमाणे पळून जाऊन आत्महत्येचा पर्याय निवडला असावा. या दोघांनीही पारडा दराडे शिवारात असलेल्या उद्धव रुस्तुम दराडे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

सदर घटना 7 मे च्या सकाळी 8 वाजेदरम्यान उघडकीस आली. यावेळी घटनास्थळी लोणार पोलिस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र देशमुख, पोलिस उपनिरीक्षक अजहर शेख, रायटर चंद्रशेखर मुरडकर, पोहेका बन्सी पवार, सुरेश काळे, गुलाबराव झोटे, पोका रवींद्र बोरे, कृष्णा निकम, जगदीश सानप यांनी भेट देउन मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय लोणार येथे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास ठाणेदार रवींद्र देशमुख यांच्या मागदर्शनात पोहेकॉ बन्सी पवार व पोकॉ. रवींद्र बोरे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.