कालिचरण महाराजच्या जामिनावर सोमवारी सुनावणी

घटना २५ डिसेंबर २०२१ ला रायपूर येथे घडली आणि वर्धा येथे २९ डिसेंबर २०२१ ला एफआयआर नोंदविण्यात आली
Kalicharan
KalicharanKalicharan
Updated on

वर्धा : महात्मा गांधी यांच्याबद्दल अपमानजतनक वक्तव्य (Insulting statement about Mahatma Gandhi) केल्याप्रकरणी वर्धा पोलिसांत कालिचरणविरुद्ध (Kalicharan) गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी वर्धा न्यायालयात आज जामीन अर्जावर सुनावणी होती. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर न्यायालयाने जामिनावर सोमवारी (ता. ७) आदेश देण्याचे निश्चित केले आहे.

कालिचरण महाराज (Kalicharan) याची बाजू ॲड. विशाल टिबडेवाल व ॲड. मोरवाल यांनी मांडली. न्यायालयासमोर युक्तिवाद करत सीआरपीसीचे कलमअंतर्गत आरोपीला पोलिस विभागाने नोटीस न बजावता अटक केली. त्यामुळे अटकेची कारवाई बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद केला. घटना २५ डिसेंबर २०२१ ला रायपूर येथे घडली आणि वर्धा येथे २९ डिसेंबर २०२१ ला एफआयआर नोंदविण्यात आली. एफआयआर नोंदवण्यास विलंब झाला.

Kalicharan
तरुणीच्या गुप्तांगातून घेतले स्वॅब; टेक्निशियनला सश्रम कारावास

तक्रारदार हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून राजकीय पार्श्वभूमीचा असून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असल्याने आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला होता. वर्धेत घटना अजिबात घडलेल्या नाहीत. त्याच घटनेत ठाणे न्यायालयाने यानंतर सरकारी वकिलांनी आरोपीला जामीन मंजूर झाला तर तक्रारकर्ता, साक्षीदार आणि पुरावे बाधित होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचा युक्तिवाद केला. तसेच विधान हे धार्मिक जातीय हिंसाचाराचे असल्याने भविष्यात धार्मिक जातीय हिंसाचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जामीन फेटाळण्यात यावा, अशी विनंती केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()