Latest Hingoli News: इसापूर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक व धरणामध्ये जमा झालेला ९७ टक्के पाणीसाठा पाहता धरणाच्या मंजूर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने शनिवारी (ता. सात) इसापूर धरणाचे तीन दरवाजे ३० सेंटीमीटरने उघडून पैनगंगा नदीपात्रात ३०३९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
इसापूर धरणाची पाणीपातळी ४४०.७६ मिलिमीटर झाली आहे. उपयुक्त पाणीसाठा ९४१.१६२ दलघमी एवढा झाला असून, धरणामध्ये ९७.६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे; तसेच इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रांतर्गत असलेल्या जयपूर बंधाऱ्यांमधून ६५९८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.