संग्रामपुर - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकाच पक्षाच्या उमेदवाराला सतत पाच वेळा निवडुन देऊन जळगाव जा मतदार संघाने एक नवा विक्रम निर्माण केला आहे..या अगोदर 1952 साली जलंब मतदार संघ असतांना शेतकरी कामगार पक्षाचे भाई के. आर. पाटील हे पहिले आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर आलटून पालटून कांग्रेस, शेकाप पक्षाचे वर्चस्व असलेल्या जलंब मतदार संघावर शिवसेने उमेदवार देऊन शेकाप आणि कांग्रेस वर मात करून विजय मिळवला होता. आता पर्यतच्या मतदार संघाच्या इतिहासात एकाच पक्षाचा उमेदवार म्हणून सतत पाच वेळा निवडून येण्याचा बहुमान भाजपचे आमदार म्हणून डॉ. संजय कुटे यांना मिळाला आहे..महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्या अगोदरपासून विधानसभा निवडणुकीसाठी जलंब मतदार संघाच्या नावावर पहिली निवडणूक शेकाप चे तत्कालीन भाई के. आर. पाटील यांनी लढवली होती. व त्यात शेतकरी आणि शेतमजूर, रिपाईच्या मदतीने त्यांचा विजय झाला होता.त्यावेळेस पासून सतत दोन वेळा पक्ष म्हणून काँग्रेसचे नावावर विक्रम होता. तर उमेदवार म्हणून सतत तीन वेळा विजयी होण्यात कृष्णराव इंगळे यांचे नाव आहे. तेही एक वेळ शिवसेना आणि दोन वेळा काँग्रेस पक्षावर लढले होते. मात्र, एकच उमेदवार एकाच पक्षावर सतत पाच पंचवार्षिक पर्यत निवडणूक लढवून विजयी होण्याचा विक्रम जळगाव जा मतदार संघ झाल्यापासून डॉ. संजय कुटे यांनी केला आहे..2004 पूर्वी जलंब नावाने असलेला हा मतदार संघ शेकापचा बालेकिल्ला म्हणून ही ओळखला जात होता. कारण शेकापची बांधणी त्यावेळी मजबूत आणि निष्ठेची असल्याने आलटून पालटून दिवंगत भाई के. आर. पाटील यांचा तीन वेळ विजय झालेला आहे. त्यावेळी कांग्रेस आणि शेकाप हेच प्रमुख पक्ष होते. 1990 साली शिवसेनेची लाट आल्याने शेकाप आणि काँग्रेसला खो देत कृष्णराव इंगळे सेनेचे आमदार बनले होते..पहिली विधानसभापासून या मतदार संघात माळी व पाटील या दोन समाजाचेच आमदार जास्त वेळ निवडून आलेले दिसतात. त्याकाळी राजकारणाला जातीय समिकरणाची घट्ट झालर होती असे म्हटल्यास गैर ठरणार नाही. असे असले तरी इतर लहान सहान समाजाला घेऊन चालण्याची रीतही होती. म्हणूनच आलटून पालटून दोन समाजाचे उमेदवारांनी सत्ता गाजवल्याचा इतिहास आहे..यामध्ये भाई के. आर. पाटील यांची 15 वर्ष व श्रद्धाताई टापरे याचे 10 वर्ष वगळता नंतरचे 30 वर्ष माळी समाजाकडे आमदारकीचे नेतृत्व राहले आहे. त्यात विठलराव उमरकर 1 पंचवार्षिक, तुळशीरामजी ढोकणे दोन पंचवार्षिक आणि कृष्णराव इंगळे यांनी एक पंचवार्षिक सेनेच्या तिकिटावर काढल्यावर नंतर पक्ष बदल करून कांग्रेसमध्ये प्रवेश करीत उमेदवारी घेतली आणि विजयी झाले.त्यांनी कांग्रेसमध्ये दोन टर्म काढल्या. या सर्वाचे रेकोर्ड ब्रेक करत जळगाव जामोद मतदार संघ झाल्यापासून सतत पाच पंचवार्षिक भाजप पक्षाकडून निवडणूक लढवत विजयी होण्याचा बहुमान डॉ. संजय श्रीराम कुटे यांच्या नावे जात आहे.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.