JP Nadda : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा अकोला दौरा रद्द; उपमुख्यमंत्री घेणार सभा; कारण...

jp nadda bjp
jp nadda bjp
Updated on

अकोला : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत अकोला येथे १४ जून रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, नड्डा यांचा अकोला दौरा तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आला आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे. या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण दरेकर यांची उपस्थिती राहील.

jp nadda bjp
Crime : जुन्या वादातून कुख्यात गुंडाचा खून! अकोला रेल्वे स्थानकावरील घटना; चौघांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या सेवा सुशासन, लोककल्याण महा जनसंपर्क अभियान अंतर्गत अकोल्यात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ता. १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर ही सभा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खासदार जे. पी. नड्डा यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

jp nadda bjp
Raj Thackeray : "ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की,..."; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

त्याऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच अभियान प्रमुख आमदार प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय कुटे, आमदार राजेंद्र पाटणी, अनंतराव देशमुख, विजयराव जाधव, बळीराम सिरस्कार, तेजराव थोरात, किशोर पाटील, अनुप धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, भाजप महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, अर्चना मसने, श्रावण इंगळे, ॲड. मोतीसिंग मोहता, डॉ. अशोक ओलबे, डॉ.रणजीत पाटील, विजय मालोकार नारायणराव गव्हाणकर, आदींच्या प्रमुख उपस्थिती राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()