- महेश जाधव
मानोरा - विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञानक पाटणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर झाली तर भाजप कडुन दिवंगत आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी सई डहाके यांना उमेदवारी मिळाली. तर वंचित बहूजन आघाडीकडून अभिजीत राठोड यां नव्या उमेदवाराला तिकीट मिळाली. मतदारसंघात पक्षांतराची लाट आली असली तरी कार्यकर्ते पक्षांतर पचविणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.