Crime: अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण, आरोपीला अटक; पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

Washim Latest News: संशयित आरोपीवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
Crime: अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण, आरोपीला अटक; पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
Updated on

Vidarbha News: झोडगा येथील अपहृत अल्पवयीन मुलगी घटनेच्या १८ दिवसांनंतर १ सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलिसांना तांदळी येथे आढळून आली होती. तिची ३ सप्टेंबर रोजी वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिचे शारीरिक शोषण झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे संशयित आरोपीवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील झोडगा येथील १७ वर्ष ९ महिने वयाच्या एका अल्पवयीन मुलीचे १४ ऑगस्ट रोजी राहत्या घरातून अपहरण केले होते. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान १ सप्टेंबर रोजी अपहृत अल्पवयीन मुलगी तांदळी येथील शैलेश समाधान गवई (वय २५) या तिच्या कथित प्रियकराच्या घरी आढळून आली होती.

Crime: अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण, आरोपीला अटक; पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
Nashik Crime News : प्रियसीच्या मुलाचा खून करणाऱ्यास पोलीस कोठडी! शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचा प्रकार उघडकीस

यावेळी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन येथील ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये हजर केले होते. दोघांचेही बयाण नोंदवण्यात आले. दरम्यान सुरवातीला मुलीने वैद्यकीय चाचणीस नकार दिला होता. अखेर ३ सप्टेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या आई-वडिलांसह ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये हजर झाली व १८ दिवसांच्या कालावधीत आरोपीने दोनदा शारीरिक शोषण केल्याचे बयाण दिले व स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घेतली.

पोलिसांनी पीडित मुलीचे बयाण व वैद्यकीय अहवालाच्या आधारे मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील आरोपीने जाणीवपूर्वक तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले असा निष्कर्ष नोंदवत आरोपी शैलेश गवई याच्याविरुद्ध कलम ६२(२), आय, ६४(२) (एएम), बीएनएस सहकलम ४,६ पोक्सो या कलमानुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी व महिला पोलिस उपनिरीक्षक शिल्पा सुरगडे करीत आहेत.

Crime: अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण, आरोपीला अटक; पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
Nashik Fraud Crime : काम न करता उपशिक्षकाने लाटले वेतन; रावळगाव इंग्लिश स्कूलमधील प्रकार

ग्रामीण पोलिसांची चांगली कामगिरी

कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनअंतर्गत मागील महिन्यात अशी दोन प्रकरणे उघडकीस आली. शेलुवाडा येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार अपहृत मुलीच्या आईने ग्रामीण पोलिसात दिली असता या प्रकरणातील आरोपीसह अपहृत अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी शोध घेत त्यांना ताब्यात घेतले व आरोपी मुलांवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पीएसआय स्वप्नील चव्हाण यांनी ठाणेदार खंडारे यांचे मार्गदर्शनाखाली केला होता. झोडगा येथील अशाच स्वरुपाच्या प्रकरणाचा छडा लावत आरोपी मुलांवर पोक्सो कायद्यान्वये कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही प्रकरणांचा छडा लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.