काटोल : विद्यार्थ्याना शाळेतून स्वयंकौशल्य व रोजगाराचे मिळणारे धडे, भविष्यात व्यवसाय संधी व कलेला चालणा देणारी बाब जि. प.उच्च प्राथमिक शाळा, थुंगाव (निपाणी) येथे अंमलात आणल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला. पालकसुध्दा त्यांच्या कलेतून खूष दिसत आहेत. हा उपक्रम उन्नती विद्यार्थी बचत बँकेकडून पणती व आकाशकंदील निर्मिती व विक्री थुंगाव (निपाणी) व तिनखेडा गावात राबविण्यात येत आहे.
विद्यार्थ्याची कला जनमाणसात जावी, या उद्देशाने आकाश दिवे व पणती उत्पादन व विक्री कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा नरखेड पंचायत समिती सदस्य महेंद्र गजबे, सरपंच बापूराव बडोदेकर (थुगाव), उपसरपंच प्रवीण चोपडे, तिनखेडाचे सरपंच सुरेश बारई, सामाजिक कार्यकर्ते जनकराव चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर चोपडे, पंढरी आखरे, किसना बन्नगरे, मुख्याध्यापक धनंजय पकडे आदींच्या उपस्थितीत पार पडला.
शालेय अभ्यासक्रमात क्रॉफ्ट कला विषय असून यात विध्यर्थ्याना कागद, रंगीत ताव आदी साहित्यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याची कला शिकविल्या जाते. विध्यर्थ्यानि ती प्रत्यक्षात वर्ग शिक्षकांचे मार्गदर्शनात आत्मसात व साकार केल्याने विद्यार्थी जगतात प्रेरणा व संदेश या निमित्याने दिला आहे. या कार्यात शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पकडे, शिक्षक संदीप बागडे, निलेश शहाकार, शिक्षण मित्र दीपाली हिवसे व संध्या नागपूरे तसेच विद्यार्थी सलोनी बडोदेकर, धीरज देशमुख, शुभम ओमकार, वैभव घागरे, युवराज रमधम आदींचे सहकार्य लाभत आहे.
आमच्या शाळेतील विद्यार्थी हा भविष्यात एक कुशल उद्योजक म्हणून पुढे यावा या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले जाते. त्यात पालकांचा सहभाग अवर्णनीय असतो.
- धनंजय पकडे, मुख्याध्यापक
जि. प.उच्च प्राथ. शाळा थुगावनिपाणी वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःच्या पाऊलखुणा निश्चित करत आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न जणू मुलांच्या डोळ्यात पाहायला मिळाले. या उपक्रमातून उद्याचे उद्योजक साकारले जात आहेत, हे पाहून समाधान वाटते.
- महेंद्र गजबे, पं. स. सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.