Khamgaon: पूरग्रस्‍त गावांचे पंचनामे करुन मदत करा, शिवसेनेची मागणी

Buldhana: काही क्षेत्र बागायती असल्यामुळे स्प्रिंकलर ठिबक, तुषार सिंचन सुद्धा वाहून गेले आहेत |
Khamgaon: पूरग्रस्‍त गावांचे पंचनामे करुन मदत करा, शिवसेनेची मागणी
Updated on

खामगाव ः खामगाव शहर व तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे व घरांचे, गोठ्यांचे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शिवसेनेच्‍या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्‍याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद आहे की, खामगाव तालुक्‍यात काल ८ जुलै रोजी रोजी अतिवृष्टी झाली. या पावसामुळे टेंभुर्णा, आवार, पिंप्री गवळी, रोहना, पिंप्राळा, कोलरी सह इतर गावांमध्ये झालेल्या ढगफुटी सारख्या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आले व त्यामध्ये शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामध्ये पूर्ण पिके वाहून गेली आहेत. त्याचबरोबर शेतातील पूर्ण माती सुद्धा खरडून गेली. काही क्षेत्र बागायती असल्यामुळे स्प्रिंकलर ठिबक, तुषार सिंचन सुद्धा वाहून गेले आहेत.

Khamgaon: पूरग्रस्‍त गावांचे पंचनामे करुन मदत करा, शिवसेनेची मागणी
Khamgaon Rain : अतिवृष्टीमुळे खामगाव तालुक्यातील 9 हजार 350 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; 95 गावे बाधित

तसेच मोठ्या प्रमाणात विहिरी सुद्धा बुजल्या जावुन विहिरींचे नुकसान झाले आहे. तसेच गुराढोरांचा चारा वाहून गेला आहे. तसेच शेतकऱ्यांच्‍या गुरांच्या गोठ्याचे नुकसान झाले तर काही नागरिकांचे घरादारात पाणी घुसून अतोनात संसार उपयोगी साहित्‍य वाहून गेले. तरी शासनाने संबंधीत बाधित गावांचा तात्काळ पंचनामा करुन शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. तसेच बरेच कुटुंबातील घरे पुराच्या पाण्यात डुबल्यामुळे काही घरांमध्ये पाणी शिरल्‍याने त्यांचे अन्नधान्य वाहून गेले आहे.

अशांना त्वरित अन्नधान्य, कपडे देऊन मदत द्यावी. तसेच कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले नालाखोली करणाचे कामे झाले नसल्याने वारंवार अशा नैसर्गिक आपत्तींना शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे यावर कामस्वरुपी उपाय योजना करावी जेणे करुन अशा प्रकारे होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीने नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही.

Khamgaon: पूरग्रस्‍त गावांचे पंचनामे करुन मदत करा, शिवसेनेची मागणी
Khamgaon News : मोबाईलवर बंदी असतानाही मतदान करतानाचे फोटो व्हायरल

या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे, शहर प्रमुख राहुल कळमकर, विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश वावगे,युवासेना तालुकाप्रमुख बहादुर वाघे, मुख्यमंत्री आरोग्य कल्याण समिती जिल्हाप्रमुख धीरज कंठाळे,युवासेना तालुका संघटक गोपाल वरणकर,सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर,महिला आघाडी तालुका प्रमुख जयश्री देशमुख,शहर प्रमुख वैशाली घोरपडे,पौर्णिमा जाधव,सोशल मीडिया विभाग प्रमुख पवन मोसे, शिवसेना उपशहर प्रमुख गजानन ऊटाळे,उप तालुकाप्रमुख गोपाल भिल,हरिदास गव्हाणे, परमेश्वर देवचे, मंगेश काळणे, सचिन काळणे, शाखा प्रमुख मारुती काळणे, संतोष जिरंगे,राजू काळणे, गोविंदा टीकार,परशुराम काळणे, विभाग प्रमुख गणेश ढगे,मनोहर काळणे,प्रज्वल राऊत,अमोल काळणे,निलेन बहादरे,सागर देवचे, विठ्ठल काळणे, पुरुषोत्तम काळणे, नितीन बहादरे, सुमित काळणे,श्रीकृष्ण कोळसे, किशोर काळणे, सुधाकर काळणे, संजय ह काळणे, सचिन गावंडे, शेख आसिफ, विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे, देवा खराबे, जनार्दन मोरे,गणेश वांडे, नयन टिकार,मंगेश खराबे, भास्कर इंगळे,रघुनाथ मुयांडे,कृष्णा पुराणे,आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Khamgaon: पूरग्रस्‍त गावांचे पंचनामे करुन मदत करा, शिवसेनेची मागणी
Nashik Bus Accident : बस दरीत कोसळून 2 मुलांचा मृत्यू! सापुतारा घाटात अपघात; जखमींना रुग्णालयात हलवले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.