जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

Know when and how much to eat read full story
Know when and how much to eat read full story
Updated on

नागपूर : अन्नाला पूर्णब्रम्ह म्हटले जाते. म्हणून ‘उदरभरण नोहो जाणिजे यज्ञकर्म’, असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. कारण, मनुष्याची सारी धावपळ उदरभरणासाठीच सुरू असते. आजही असे बरेच जण आहे ज्यांना दोन वेळचे जेवण नीट मिळत नाही. तर काहींकडे काय खावे अन् काय नाही अशी स्थिती असते. ज्याप्रमाणे उपासमारीमुळे आरोग्य बिघडते त्याचप्रमाणे अधिक सेवनामुळेही आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. दररोज जेवण करायचे तरी किती, हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

जेव्हा आपण घरी जेवण करतो तेव्हा घरातील महिला मोठ्या प्रेमाने आणि आग्रहाने वाढतात. त्यावेळी आपल्याला एक-दोन पोळ्या नेहमी जास्तच खायला दिली जातात. भारतीय जेवण हे पोळीशिवाय अपूर्ण आहे आणि या पोळीतच बरीच शक्तीदेखील असते. पोळीची चव इतकी चांगली असते की भाजी कोणतीही असली तरी आपण ती पोळीसोबत आवडीने खातो. परंतु, हेच अधिकचे जेवण अनारोग्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

जेव्हा लहान मुले भाजीसोबत पोळी खात नाहीत तेव्हा त्यांना दूध-पोळी, दही-पोळी किंवा साखर-पोळी अशा स्वरूपात खायला दिले जाते. प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार जेवण करतो. काही लोक वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम पोळी खाणे बंद करतात. पण या प्रकरणात, आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आपण किती पोळ्या खायच्या याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा आरोग्याच्या समस्या निर्माण होऊन डाॅक्टरकडे जावे लागू शकते.

किती असावा रोजचा आहार

गव्हाच्या पिठाची पोळी बहुतेक प्रत्येक भारतीय घरात बनविली जाते. यात पोषक घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. यामध्ये प्रथिने आणि फायबरची मात्रा उत्तम असते. अशा परिस्थितीत जेव्हा आपण पोळी खातो तेव्हा आपले पचन योग्य होते. जेव्हा आपण एक पोळी खातो तेव्हा आपल्या शरीराला सुमारे १५ ग्रॅम कार्ब, ३ ग्रॅम प्रथिने आणि ०.४ ग्रॅम फायबर मिळते. शरीराचे वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीरात किती कार्ब आवश्यक आहेत हे जाणून घेणेदेखील महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत आपण त्यानुसार पोळी खाणे आवश्यक आहे. जर आपण दूध, सोडा, साखर किंवा तेल अशा गोष्टी खाल्ल्या तर आपल्या शरीरात कार्बचे प्रमाण वाढते. जर आपण अशा गोष्टी अधिक खात असाल तर पोळी खाणे कमी करणे कधीही चांगले.

पोळी कोणत्या वेळी खावी

वजन कमी करण्यासाठी किती पोळ्या खाव्या हे माहिती असणे आवश्यक आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे पोळ्या खाण्याचे प्रमाण पुरुष आणि स्त्रियांमध्ये बदलते. जर तुम्ही एक महिला असाल आणि आपला आहार दिवसाला १४०० कॅलरी असेल तर आपण दिवसा दोन आणि रात्री दोन पोळ्या खाल्ल्या पाहिजेत. दुसरीकडे, जर आपण पुरुष असाल आणि आपला आहार १७०० कॅलरीचा असेल तर आपण दररोज चार ते सहा पोळ्या खाऊ शकता. वजन कमी करण्यासाठी किती पोळ्या खाणे आवश्यक आहे. तसेच कोणत्या वेळी खाव्या हेदेखील आपल्याला लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते रात्रीपेक्षा दिवसा पोळी खाणे केव्हाही चांगले. पोळीत फायबर असते जे पचन करण्यास थोडे जड असते. त्यामुळे जेव्हा आपण दिवसा पोळी खातो तेव्हा आपण दिवसा केलेल्या परिश्रमामुळे जेवण किंवा पोळी लगेच पचते.

भातापेक्षा पोळी केव्हाही बरी

जेव्हा आपण रात्री पोळी खातो आणि झोपतो तेव्हा त्याची पचन प्रक्रिया चालूच राहते. पण, शरीरासाठी ते योग्य मानले जात नाही. अशा परिस्थितीत रात्री पोळी खाणे योग्य नाही. तरी भाताच्या सेवनापेक्षा पोळीचे सेवन अधिक चांगले मानले जाते. पोळीत ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे पोट जास्तच फुगते. तसेच हळूहळू रक्तातील साखरेच्या पातळीवर त्याचा परिणाम होतो. दुसरीकडे भाताला ग्लाइसेमिक निर्देशांक जास्त असतो आणि तो लवकर पचतो. परंतु, भात आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर वेगवान परिणाम करतो. अशा वेळी पोळ्या खाणे कधीही चांगले मानले जाते.

वारंवार तापवलेले तेल अपायकारक
दररोच्या जेवणात वरण, भात, भाजी आणि पोळीसोबच सलादचा समावेश असणे आवश्यक आहे. कारण या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स असण्यासोबतच ते पचायला हलके असतात. प्रत्येक व्यक्तीने महिन्याकाठी ५०० ते ७५० मिली. तेलाचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले आहे. यापेक्षा अधिक तेलाच्या सेवनाने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. वारंवार तापवलेले तेल आरोग्यासाठी अपायकारक आहे. शक्यतो अशा तेलातील पदार्थ खाणे टाळावे. सध्याच्या कोरोना काळात व्हिटॅमीन सी युक्त पदार्थांचा समावेश आहारात करावा. भारतीयांमध्ये व्हिटॅमीन डीची कमतरता जाणवते. त्यामुळे सकाळचे कोवळे उन्ह अंगावर घेणे चांगले आहे.
- डॉ. कविता गुप्ता,
आहारतज्ज्ञ, नागपूर

संकलन, संपादन : अतुल मांगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()