State Level Chess Tournament : शेतकरी कुटुंबातील कृष्णाची बुद्धिबळ स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड

संग्रामपूर तालुक्यातील आवार येथील कृष्णाची बुद्धिबळ स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झाली
Krishna gets selected for state level chess tournament buldana
Krishna gets selected for state level chess tournament buldanaSakal
Updated on

संग्रामपूर : तालुक्यातील आवार येथील कृष्णाची बुद्धिबळ स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झाली असून त्या साठी त्याच्यावर अभिनंदन व कौतुका चा वर्षाव होत आहे.भारत देशात शिक्षण व खेळ या दोनीही गोष्टी चा विचार केला तर या दोनीही बरोबरित चालणाऱ्या आहेत

या दोनीही मध्ये आपण स्वतःच व देशाचं नाव करू शकतो त्या साठी पाहिजे जिद्द, चिकाटी, परीक्षम, मेहनत आणि दिमाक.या दोनीही बाबतीत भारतीत जर पाहिले तर शेकडो शिक्षित व वेगवेगळे खेळाडू मिळतील असा म्हणायला हरकत नाही की भारत आता खेळाडू तयार करणारी सोन्या सारखा देश आहे मग तो खेळ कोणताही असू द्या.

आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागात खेळाडू खूप आहे फक्त त्यांना पाहिजे वेळेवर मिळणारी कोचिंग आणि सुविधा. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील अकोला जिल्ह्याच्या सीमेवर बसलेले एक छोटेसे गाव म्हणजे आवार गाव या गावची लोकसंख्या जेमतेम 2000 ते 2500 इथे शिक्षण 1 ते 7 पर्यंत आहे.

पुढील शिक्षन साठी या गावातील विद्यार्थी तेल्हारा,अकोला,शेगाव, वरवट,पातुडाँ या ठिकाणी जातात.शिक्षण सोबत खेळ हा महत्वाचा घटक आहे.आवार येथील शेतकरी प्रशांत अहिर यांचा मुलगा कृष्णा वय 15 वर्ष पुढील शिक्षण साठी तेल्हारा येथे गेला.

प्रशांत अहिर याच सर्व व्यवहार हे शेतीवर आहेत त्यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून थोडी काटकसर करून तेल्हारा येथे जाणे निवडले आणि तेल्हारा येथील स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ मध्ये प्रवेश करून पुढील शिक्षण ची सुरवात कृष्णा केली.

कृष्णा ला शिक्षण सोबत बुद्धिबळ ची आवड लागली जो कोनी बुद्धिबळ खेळत असे तिथे कृष्णा पोहोचत असायांचा आणि बुद्धिबळ खेळत असायचा.खेळता खेळता तो चॅम्पियन झला आणि दि 17 ऑक्टोबर 2023 रोजी सर्वात प्रथम तो क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत बुलडाणा जिल्हा क्रीडा समिती,

बुलढाणा क्रीडा अधिकारी व क्रीडा संकुल बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या विभागातरीय बुद्धिबळ स्पर्धेत 17 वर्षाखालील वयोगटात विभाग स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली होती आनि त्याची निवड सिंधुदुर्ग येथे झाली होती.

या नंतर दि 20 जुलै 2024 रोजी झालेल्या अकोला महानगर जिल्हा चेस असोसिएशनच व प्रभात किड्स यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत वयोगट 15 वर्ष मध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला तर 19 वर्ष वयोगट मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आणि दि 21 जुलै रोजी झालेल्या खुल्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला या तीनही वयोगटात कृष्ण प्रशांत अहिर ची राज्यस्तरावर निवड झाली आहे.

आयोजक प्रभात किड्स चे डाँ गजानन नारे,संत तुकाराम हॉस्पिटल चे डाँ गिरीश अग्रवाल,जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष संदीप फुंडकर,सचिव जितेंद्र अग्रवाल, बुद्धिबळ प्रशिक्षक अग्रवाल या मान्यवर च्या हस्ते कृष्णा ला शिल्ड व पारितोषिक देउन सन्मानित करण्यात आले.या बुद्धीबळ स्पर्ध साठी कोच म्हणून विशाल बावणे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि मेहनत लाभली आहे.

लहानपणा पासून बुद्धिबळ हा खेळ आवडतो मात्र ग्रामीन भागात बुद्धिबळ खेळ साठी कोणी सापडत नव्हते,तेल्हारा सारख्या शहरात गेल्यानंतर मागील 4 वर्षांपासून मी या खेळावंर आणखी जोर दिला.आणि प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेत मी सहभागी होण्याच प्रयत्न करतो. माझे स्वप्न आहे की मी भविष्यात लहान ग्रँडमास्टर रामेशबाबू प्रज्ञानंद सारखा बुद्धिबळ खेळलो पाहिजे आणि या देशाचा नाव मी जगाच्या पातळीवर कोरले पाहिजे.

- कृष्णा प्रशांत अहिर आवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com