Amaravati News : लेकरांच्या जीवाशी खेळ! नामांकित कंपनीच्या 'बेबी फूड'मध्ये सापडल्या अळ्या; व्हिडीओ आला समोर

Larvae found in baby food packets : हे बेबीफूड खाल्ल्यानंतर दीड वर्षाचे बाळ आजारी पडले असून गेल्या तीन दिवसापासून बाळावर उपचार सुरू आहेत.
Larvae  found in baby food packets of a reputed company in Amravati Latest Marathi News rak94
Larvae found in baby food packets of a reputed company in Amravati Latest Marathi News rak94
Updated on

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी अन्न पदार्थांमध्ये धोकादायक वस्तू किंवा अळ्या इत्यादींसारखे गोष्टी आढळल्याच्या घटना समोर येत आहेत. यादरम्यान आता अमरावतीमध्ये असाच धक्कादायक प्रकार समोर आला असून एका नामाकिंत कंपनीच्या बेबी फूडमध्ये चक्क अळ्या सापडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

साम टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, बेबी फूड बनविणाऱ्या नामांकित कंपनीच्या बेबी फूड पॉकेटमध्ये अळ्या आढळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे बेबीफूड खाल्ल्यानंतर दीड वर्षाचे बाळ आजारी पडले असून गेल्या तीन दिवसापासून बाळावर उपचार सुरू आहेत.

Larvae  found in baby food packets of a reputed company in Amravati Latest Marathi News rak94
Jayant Patil : धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "तो आमचाच..."

या बाळाची आई बाळ आजारी पडल्याने डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी फूड इंफेक्शन झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी घरी येऊन बाळाला देण्यात आलेले बेबी फूड तपासले असता त्यात आळ्या आढळल्याचे महिलेने सांगितले.

लहान बालकांसोबत जीवघेणा प्रकार सुरू असल्याने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे माधुरी विक्रम ढोके, राहणार अमरावती यांनी सांगितले. तसेच त्यांनी प्रशासनाला कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Larvae  found in baby food packets of a reputed company in Amravati Latest Marathi News rak94
Viral Video : भारतात घुसण्यासठी 'बजरंगी भाईजान टेक्निक', बांगलादेशी यूट्यूबरच्या व्हिडीओमुळे खळबळ; नेमकं काय आहे प्रकार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.