अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात ‘लेदर’ उद्योगाची मुहूर्तमेढ

लेदर उद्योग
लेदर उद्योगलेदर उद्योग
Updated on

दर्यापूर (जि. अमरावती) : दर्यापूरमधील शासनाचा उपक्रम म्हणून ख्यातीप्राप्त असलेले लेदर उद्योग बंद पडल्यानंतर दर्यापूरची ही ओळख पुसण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, शिवर येथील तरुण उद्योजकाने परिश्रमाने नवा उद्योग सुरू करीत यापासून विविध वस्तू बनविण्याचा कारखाना सुरू केला आहे. त्यामुळे दर्यापूरची ओळख कायम राहण्यासोबतच येथील युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या उद्योगातून पादत्राणे, बॅग, लेडीज पर्स, सुटकेस आदींचे उत्पादन होणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाकडून मदत घेत गोपाल चंदन या तरुणाने ही भरारी घेतली आहे. महाराष्ट्राच्या उद्योगात दर्यापूरचे नाव आता जोडले जाणार आहे. यासह रोजगार निर्मितीला या उद्योगामुळे मदत होणार आहे. एलआरसी लेदर क्लस्टरचा उद्घाटन सोहळा विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. हर्षदीप कांबळे यांनी आपल्या सविस्तर मार्गदर्शनात युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगातून प्रगती साधावी, शासन त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत एलआरसी लेदरचे कौतुक केले. गोपाल चंदन हे दर्यापूर तालुक्याचे तसेच पंचक्रोशीतील सर्व जनतेला परिचित असलेले उद्योगी व्यक्तिमत्व आहे.

लेदर उद्योग
...अन् पतीने फोडला हंबरडा; अपघातात गर्भवतीसह बाळाचा अंत

शिवर येथील भव्य जागेत कारखाना उभारीत चंदन यांनी वस्तूंची निर्मिती सुरू केली. पुढे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने त्यांच्या जिद्दीला प्रोत्साहन देत या उद्योगाच्या वाढीकरिता मदत केली. सद्यस्थितीत लेदर पासून विविध वस्तू बनवीत परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या वस्तू आता देशाच्या विविध भागात विक्रीस उपलब्ध होणार असून दर्यापूरचे नाव उद्योग क्षेत्रात मानाने घेतले जाणार आहे.

प्रेरणादायी उद्योग

गेल्या अनेक दिवसांपासून दर्यापूरमध्ये नव्या उद्योगासाठी प्रयत्नरत असलेल्या अनेकांना गोपाल चंदन यांच्यापासून प्रेरणा मिळणार आहे. दर्यापूर शहरात लिडकॉम या शासनाच्या अंगीकृत व्यवसायातून लेदर वस्तू तयार होत होत्या, मात्र हा व्यवसाय आश्चर्यकारकपणे बंद पडला. मात्र, अशा पद्धतीचा उद्योग उभा राहावा यासाठी याबाबत यशस्वीपणे प्रयत्न करीत चंदन यांनी परिश्रम घेत नव्या उद्योगाची स्थापना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.