Leopard attack : बिबट्याच्या हल्ल्यात तीन जनावरे ठार, नंदापूर कोदेगाव शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी

Leopard attack : सावनेर तालुक्यातील नंदापूर आणि कोदेगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जनावरे ठार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Leopard attack
Leopard attacksakal
Updated on

खापा : सावनेर तालुक्यातील खापा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. या बिबटाने नंदापूर व कोदेगांव परिसरातील शेतकऱ्यांच्या वासरांवर हल्ला करून ठार केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वनविभागाने परिसरात फिरत असलेल्या या बिबट्याचा शोध घेऊन त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी खापा परिसरातील नंदापूर व कोदेगांव येथील नागरिकांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.