आवश्यक खबरदारी घ्या, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन; जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

lockdown may starts if people violate rule says gadchiroli collector
lockdown may starts if people violate rule says gadchiroli collector
Updated on

गडचिरोली : राज्यात विविध शहरांत कोरोना रुग्णांची वाढ विचारात घेता जिल्ह्यातही नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून जिल्ह्यात काही प्रमाणात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी मंगळवार (ता. 16) दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीनंतर ते संबंधित विभागाच्या प्रमुखांशी बोलत होते. जिल्हाधिकारी सिंगला म्हणाले की, नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, शारीरिक अंतर पाळणे तसेच गर्दी न करणे याबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्‍यक आहे. या सूचनांची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी त्यांनी यावेळी संबंधित विभाग प्रमुखांना सूचना दिल्या. जिल्ह्यात रुग्ण संख्येत घट झाली असली तरी काही प्रमाणात पुन्हा रुग्ण वाढ दिसत आहे. तसेच ही संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य विभागासह पोलिस विभागाने दक्षता बाळगावी, असे जिल्हाधिकारी सिंगला यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात नागरिकांनी कोरोनाबाबत शिस्त नाही पाळली, तर पुन्हा काही प्रमाणात कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही जिल्हाधिकारी सिंगला यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये यात्रा, जयंती तसेच लग्न समारंभ या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, अशा वेळी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत खबरदारी म्हणून पोलिस तसेच आरोग्य विभागाने योग्य ती कारवाई करणे आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले.

सध्या कोरोना लसीकरण सुरू  आहे व रुग्ण संख्याही या महिन्यात कमी झाली. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असल्याचे जाणवत आहे. परंतु, राज्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्ण पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गडचिरोलीत यापुढे नागरिकांनी आवश्‍यक खबरदारी घेऊन कोरोना संसर्ग वाढू न देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अन्यथा त्यांनी पुन्हा जिल्ह्यात कठोर निर्णय घेऊन लॉकडॉऊन सुरू  करण्याचे संकेत यावेळी बैठकीत दिले. या बैठकीला आरोग्य विभागातील अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.