Loksabha Election Voting : दुपारी 12 ला मतदानाचा हक्क बजावला आणि 3 वाजता घेतला जगाचा निरोप

बुलढाणा जिल्ह्यातील घटना.
anusaya wankhade
anusaya wankhadesakal
Updated on

संग्रामपूर (बुलढाणा) - सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणूक 2024 ची तयारी जोरदार सुरू आहे. या साठी निवडणूक आयोग पूर्ण दिवस रात्र एक करत आहे एकही व्यक्ती मतदाना पासून वंचित राहू नये. यांची काळजी घेणे सुरू आहे.

यासाठी ग्रा. प. च्या कर्मचारी पासून तर निवडणूक आयोग दिल्ली पर्यंत चे अधिकारी मेहनत घेतांना दिसत आहेत. घरपोच मतदान सुविधे चे परिणाम ही चांगले येत आहेत. उदाहरण म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुडाँ येथील वयोवृद्ध महिलेचे. सदर महिलेने दुपारी 12 वाजता मतदानाचा हक्क बजावला आणि त्याच दिवशी 3 वाजता जगाचा निरोप घेतला. ही घटना लोकसभे च्या दृष्टीने चर्चेची ठरत आहे.

मृत्यू हा अटळ आहे तो कोणालाही चुकला नसून मृत्यू कधीही येऊ शकते मात्र त्या पूर्वी काही तरी चांगले काम करून जावे अशी म्हण इंथे तंतोतंत बसते.निवडणूक आयोगाने घर पोच मतदान चा फायदा पातुडाँ येथे झाला आहे. निवडणूक आयोगाने या वर्षी पासून जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे व मतदान पासून कोणीही वंचित राहिले नाही पाहिजे म्हणून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.

85 वर्षा वरील मतदार आणि 40 टक्के पेक्षा जास्त असलेल्या अपंग (मतदान खोली पर्यंत जाऊ न शकणारे) याना आरामात मतदान करण्याचा पर्याय असेल त्याला pwd असे नाव दिले आहे. कोविड 19 संकट दरम्यान 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुक दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेला हा उपक्रम प्रायोगिक पोस्टल मतप्रत्रिकेद्वारे मतदान करण्यात येईल असे निवडणूक आयोगाने सांगितले व 2024 च्या लोकसभा मध्ये सुरवात करण्यात आले.

येथील बुथ क्र 224 चे अनुसया नारायण वानखडे वय 86 वर्ष याचे अधिसूचना जाहीर झाल्यापासून 5 दिवसच्या आता फ्रॉम 12 डी भरून घेतला व तो निवडणूक असयोगाने पात्र ठरवत त्यांना होम मतदान बाजावण्याचा हक्क दिला.होम मतदान दि 21 पासून सुरू झाले होते या बुथचे बीएलओ संजय सातव यांनी दि 21 ला दुपारी 12 च्या दरम्यान निवडणूक विभागचे कर्मचारी याना सोबत घेऊन अनुसया नारायण वानखडे यांचे पोस्टल मतदान करून घेतले.

आणि दुपारी 3 वाजता त्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मात्र जाता जाता त्यांनी आपला मतदानचा हक्क बजावला. हे शक्य झालं ते निवडणूक आयोगाने घेतलेल्या नवीन नियम मुळे आणि तेवढ्याच तत्परतेणे मतदान करून घेणाऱ्या बीएलओ व त्या कर्मचारी मुळे. मतदानच्या गिणतीत एक मतदान वाढले ही मोठी बाब निवडणूक विभागसाठी आहे. या निर्णयामुळे जास्तीत जास्त मतदान होऊन कोणीही मतदान पासून वंचित राहणार नाही व मताचा टक्का ही वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.