Lonar : मुस्लिम-हिंदू बांधवांनी रक्तदानातून दिला शांती दिवसाचा संदेश

वेगवेगळे उपक्रम व सामाजिक कार्यक्रम राबविले जातात
Lonar
Lonarsakal
Updated on

लोणार : ईद मिलादुन्नबी च्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करून शंभरावर हिंदू मुस्लिम बांधवांनी आंतरराष्ट्रीय शांती दिवसाच्या एक सकारात्मक संदेश दिला आहे.जमियते उलमाए हिंदचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी आणि विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशनशाह कासमी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार येथे रविवारी (ता. ९) इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल, जामा मजिद चौक लोणार येथे ईद ए मिलादून्नबी च्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने जागतिक पातळीवर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

वेगवेगळे उपक्रम व सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून लोणार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये हिंदू-मुस्लिम तसेच इतर धर्माच्या लोकांनी बहुसंख्येने रक्तदान करून गरजू पर्यंत आपला रक्त पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. दुपारी ४:०० वाजे पर्यंत ९२ लोकांनी आपले रक्तदान केले होते.

सदर शिबिराला शहरातील अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन आपली उपस्थिती व योगदान दर्शविले. यामध्ये डॉ. के. बी.मापारी, राजेश मापारी, गटनेते भूषण मापारी, प्रा. बळीराम मापारी, रौनक अली, बीलाल सेठ, साहेबराव पाटोळे, नगर सेवक आबेद खान, पत्रकार शेख समद, हाजी इर्शाद अली, हाजी मेहमूद, डॉ. फिरोज शाह, काँग्रेस शहराध्यक्ष नितीन शिंदे, जफर खान, फिरोज पठाण, गफ्फार सेट, नगर सेवक राऊफ भाई, रमजान, प्रा. तैफिक, ताहेर, अन्नू , प्रा. अकील, कादर सेट, ताहेर कुरेशी, आमेर, निसार शेख, डवकेट खिजर सिद्दिकी, फैजान इत्यादींचा समावेश आहे.

शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जमिअते उलमाए हिंद शाखा लोणार च्या सर्व सदस्य यामध्ये रिजवान जड्डा, जमीतचे शहराध्यक्ष हाफिज आयाज, मौलाना तारीक,हाजी मसूद सेट, रिजवान खान करामत खान, वसिफ अहमद खान, आतिफ सिद्दिकी सर, इम्रान खान साहेब खान,डॉक्टर ताहेर, असलम परवेज, नईम सर, शेख साहेब, मोहम्मद जकी, शेख फरजीन, शेख सोहेल व इतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()