अमरावती : ऑगस्ट महिन्यात पावसाने धरलेल्या संततधारामुळे खरिपातील पिकांना धोका निर्माण झाला असतानाच सिंचन प्रकल्पातील जलसाठा पूर्ण झाला आहे. खबरदारी म्हणून अप्पर वर्धासह तीन मध्यम प्रकल्पांची दरवाजे उघडावी लागली आहेत.
१ जून ते २८ ऑगस्ट या कालावधीत सरासरी ९२.६ टक्के (६३० मिमि) पाऊस झाला आहे. आता पावसाने थांबले पाहिजे असे म्हणण्याची वेळ मात्र आली आहे.
यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाल्याने पेरण्याही लवकर आटोपल्या. जून व जुलैमध्ये जिल्ह्यात ४२३ मिमि पावसाची अपेक्षा होती, मात्र पावसाने सरासरी ओलांडली व या दोन महिन्यात सरासरी १०९ टक्के ( ४६१ मिमि) पाऊस बरसला. ऑगस्टमध्ये तो २५७ मि मि अपेक्षित असताना २८ ऑगस्टपर्यंत १६८ मिमि झाला असून त्याची सरासरी ६५ टक्के आहे. त्यामुळे १ जून ते २८ ऑगस्ट या कालावधीत पावसाने सरासरी गाठली आहे. जिल्ह्यात ९२ टक्के पाऊस झाला असून गुरुवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा संततधार धरल्याने शेतातील पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. मूग व उडद उध्वस्त झाला असून सोयाबीनचे नुकसान चाळीस टक्क्यांवर होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठा वाढला असला तरी खरीप हंगाम मात्र धोक्यात येऊ लागला आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस बरसला आहे. पिकांना सूर्यप्रकाश मिळत नसल्याने कीड व विविध रोगांचे आक्रमण झाले असून मूग व उडदापाठोपाठ आता सोयाबीनलाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पाऊस थांबायला हवा असे म्हणण्याची वेळ आली आहे.
धरणांमध्ये मुबलक जलसाठा
जिल्ह्यातील अप्परवर्धा या मोठ्या सिंचन प्रकल्पासह चार मध्यम प्रकल्पात प्रकल्पीय जलसाठा पर्याप्त झाला असून येवा वाढत असल्याने खबरदारी म्हणून धरणांची दरवाजे उघडावी लागली आहेत. अप्पर वर्धा धरणांची सर्व १३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. शहानूर, पूर्णा आणि सपन या तीन मध्यम प्रकल्पाची प्रत्येकी दोन दरवाजे उघडण्यात आली असून विसर्ग सुरू आहे.
संपादन - नरेश शेळके
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.