"मधू' इथे अन्‌ "चंद्र' तिथे! कोरोनाच्या अमावस्येने केलीय प्रेमी युगुलांची ताटातुट

love.
love.
Updated on

वरुड (जि. अमरावती) : गेल्या दोन महिन्यांपासून प्रेमाला सुद्धा कोरोनाचा विळखा पडला आहे. चोरून भेटण्यासाठी जिवाचा आटापिटा करणाऱ्या प्रेमवीरांची लॉकडाउनमुळे "मधू' इथे अन्‌ "चंद्र' तिथे, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे आता पौर्णिमेचा चंद्र पाहण्यासाठी अनेक प्रेमवीर कोरोनाची अमावस्या सरण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. असे म्हटले जाते, ते खरेही आहे, कारण प्रेम हे प्रेमच असतं, ते कधी, कुठे, कोणावर होईल सांगता येत नाही. प्रेमाला कैद करता येत नाहीे. परंतु आता प्रेमच कैद झालयं! एरवी एकमेकांना भेटण्यासाठी निदान पाहण्यासाठी, एका नजरेसाठी, चंद्र-तारे तोडून आणण्याची भाषा करणारे अनेक प्रेमवीर सध्या हतबल आहेत. चोरून भेटण्याची मजा काही औरच म्हणणारा प्रेमवीर जागीच थबकला आहे. लपूनछपून उडणारी कबुतरे आता पिंजऱ्यात अडकली, कारण घराबाहेर पडता येत नाही, सगळेच घरात असल्याने एकांत मिळत नाही. सतत सहवास लाभत असताना आता मॅसेज किंवा व्हॉट्‌सऍपवर तहान भागवावी लागत आहे. जीव कितीही कासावीस होत असला तरी पर्यायच नाही. जुन्या गाठीभेटी, तो शुक्रतारा मंद वारा निव्वळ आठवण्याशिवाय पर्याय नाही. कारण जगात उद्रेक माजविणाऱ्या या कोरोना विषाणूच्या प्रभावाने प्रेमवीर ते बाहुबली सर्वांनाच लॉकडाउन व्हावे लागले. एकमेकांची भेट होणे कठीण होऊन बसले, तर काहींचा आवाजही बसला. त्यामुळे मौसम कितीही खुणावत असला तरी पर्यायच नाही. आता फक्त कोरोनाची अमावस्या संपण्याची वाट, कारण "मधू' इथे आणि "चंद्र' तिथे अडकल्याने सध्यातरी दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे, असेच म्हणावे लागत आहे.

सविस्तर वाचा - सामूहिक चाचणीचा निर्णय राज्याने घ्यावा
"ती' लॉकडाउनच
घरातील काही वस्तू आणण्याच्या बहाण्याने तो घराबाहेर पडत आहे. पण क्‍लासेस बंद आहेत, मैत्रिणीकडे जाण्यास मज्जाव आहे, लग्नसमारंभ बंद आहेत, त्यामुळे ती घराबाहेर पडूच शकत नाही. त्यामुळे प्रेमीयुगलांची ताटातूट झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()