Vidarbha Rain News : काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात अडीच फुटाने वाढ

२२ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता पाणीपातळीत वाढ होऊन तिसऱ्यांदा अडीच फुटाणे वाढ झाली आहे
dam
damesakal
Updated on

महान : येथील धरण पाणलोट क्षेत्रात आणि परिसरात ता. २२ जुलै रोजी सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दुपारपासून पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली असून, धरण पाणलोट शेतरात आणि फेट्रा, धानोरा परिसरातील पाण्याचा पुराचे आगमन काटेपूर्णा प्रकल्पात असल्याने ता. २२ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता पाणीपातळीत वाढ होऊन तिसऱ्यांदा अडीच फुटाणे वाढ झाली आहे. वृत्त लिहेपर्यत प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होणे सुरूच होती.

याआधी ता. १८ जुलै रोजी धरणात २५.९० टक्के एवढा जलसाठा शिल्लक राहिला होता. त्यानंतर ता.१९ जुलै रोजी प्रकल्पाच्या पाणी पातळीत पहिली मोठी वाढ चार फुटाणे झाली होती. त्यावेळी पाणी पातळी २५.९० टक्क्यावरून पुढे ३५.६३ वर पोहोचली होती.

नंतर ता. २० जुलै रोजी दुसऱ्यांदा धरणाच्या पाणी पातळीत अर्ध्या फुटाणे वाढ झाली. प्रकल्पात वाढत असलेला जलसाठ्याचे पाणी मुख्य काटा कोंडाला नदीचे नसून धरण पाणलोट क्षेत्रामधील आणि कावेरी नदीचे असल्याने वाढ स्थिर झाली होती. परंतु, ता. २२ जुलै रोजी सकाळपासून मुसळधार ४५ मिली मीटर पाऊस कोसळल्याने तिसऱ्यांदा पाणी पातळीत मोठी वाढ झाली.

dam
Vidarbha Flood News : पुराच्या पाण्यात वाहून गेलेला पृथ्वीराज सुखरुप

असल्याचे महान पाटबंधारे विभागात नोंद करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता महान धरणाची पाणी पातळी ११२८.०० फूट, ३४३.८२ मीटर, ३८.३१८ दलघमी आणि ४४.३७ टक्के एवढा जलसाठा प्रकल्पात आजरोजी आहे.

मुख्य गेटवर आले तीन फूट पाणी

ता. १८ व १९ जुलै रोजीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रकल्पाच्या मुख्य गेटला पाण्याने स्पर्श केले होते. आज ता. २२ जुलै रोजी झालेल्या पाणी वाढीमुळे धरणाचे पाणी मुख्य गेटवर तीन फुटापर्यंत आले आहे. धरणाची पाणी पातळी १०० टक्के होण्याकरिता आणखी १३ फूट पाण्याची गरज आहे.

dam
Vidarbha Rain : यवतमाळ, बुलडाण्यात आभाळ फाटले

शेवटचा व्हॉल पाण्यापासून तीन फूट दूर

अकोला शहरासाठी पाणी पुरवठाकरिता काटेपूर्णा प्रकल्पात एकूण पाच व्हॉल बसविलेले असून, त्यापैकी चार व्हॉल पाण्यामध्ये बुढली असून, शेवटचा व्हॉल पाण्यापासून केवळ तीन फूट दूर आहे. धरणातील वाढत्या जलसाठ्याकडे उपकार्यकारी अभियंता विशाल कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता पल्लवी नीलगुंडे, मनोज पाठक, सुखदेव आगे, नाना शिराळे, प्रतीक खरात, अमोल पाटील, श्री. गवई, श्री. भोंबे, श्री. संतापे लक्ष ठेऊन आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.