Maharashtra flood situation Gadchiroli: पुणेचं नाही तर गडचिरोलीला पावसाने झोडपले, तब्बल 50 मार्ग बंद! आवश्यक गोष्टींचा तुटवडा

Maharashtra flood situation update: पूरस्थितीमुळे गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून भाजीपाला, दूध, ब्रेड अशा आवश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे.
flood situation update
flood situation updateesakal
Updated on

राज्यात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यासह गडचिरोलीत देखील भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले असून नागरिकांनी आवश्यकतेशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पाऊस थांबत नाही-

गेल्या सहा दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता जिल्ह्यातील तब्बल ५० मार्ग पुरामुळे बंद पडले आहेत. गोसेखुर्द धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असतानाच वैनगंगा नदीचे पूर ओसरत आहे. मात्र, गुरुवारी दिवसभर गडचिरोली जिल्ह्यात पाऊस झाला. या पावसामुळे अनेक छोट्या नाल्यांना पूर आला असून ५० मार्ग बंद आहेत.

आवश्यक गोष्टींचा तुटवडा-

पूरस्थितीमुळे गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून भाजीपाला, दूध, ब्रेड अशा आवश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे, त्यामुळे वैनगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. नदीचे रौद्ररुप लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

flood situation update
Pune Heavy Rain Photos: पुण्यात रात्रभर नॉनस्टॉप धो-धो कोसळला, पावसाचे भयानक दृश्य कॅमेरात कैद! हैराण करणारे फोटो पाहा

गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख बंद पडलेले मार्ग-

1)गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग शिवणी नाला
2)आलापल्ली भामरागड रस्ता (पर्ल कोटा नदी), (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला)
3)गडचिरोली आरमोरी राष्ट्रीय महामार्ग (पाल नदी)
4) आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग दिना नदी  
5) आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ( पुसकपल्ली नाला)
6) अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा  रस्ता राज्यमार्ग (वट्रा नाला) (मोदुमतूरा नाला) (देवलमारी नाला)
7)भाडभिडी तळोधी राज्यमार्ग हिवरगाव नाला
8)चामोर्शी हरण घाट मुल रस्ता राज्यमार्ग
9) भामरागड धोंडराज कवंडे राज्यमार्ग (जुवी नाला)
10) एटापल्ली गट्टा रस्ता राज्यमार्ग (बांडीया नदी अलदंडी गावाजवळ)
11)पेंढरी ते पाखांजुर राज्यमार्ग
12) भेंडाळा लखमापूर बोरी गणपुर अनखोडा रस्ता  (हळदीमाल नाला)  (कळमगाव नाला)
13) चामोर्शी फराळा मार्कडादेव रस्ता  
14) झिंगानुर कल्लेड देचली पेठा रस्ता
15) मानापुर अंगारा रस्ता
16) गिलगाव पोटेगांव रस्ता
17) मुरखडा गुरवडा रस्ता
18) गडचिरोली खरपुंडी रस्ता
19) जोगणा मुरमुरी रस्ता
20) माल्लेरमाल खुटेगाव रस्ता
21) देवापूर पोटेगाव रस्ता  
22)अमिर्झा मौशीखांब रस्ता  
23)आष्टी ईल्लुर रस्ता  
24) चांदेश्वर टोला ते रशमीपुर रस्ता
25)फोकुर्डी ते मार्कडादेव रस्ता
26) पोटेगाव राजोली रस्ता  
27) कृपाळा गुरवडा रस्ता  
28)चांदाळा कुंभी रस्ता
29) दवंडी खांबाळा मुस्का रस्ता
30) शिवराजपुर फरी मोहटोळा रस्ता  
31) आमगाव सावंगी रस्ता
32) शिवणी कृपाळा रस्ता
33) क्रिस्टापुर परकाभट्टी रस्ता
34) पेठा ते यलाराम रस्ता
35) वडसा ते जमभुळगट्टा रस्ता
36) घोटसूर कारका रस्ता
37) सोमनुर मुक्तापूर रस्ता
38) जोगनगुडा उमानुर रस्ता
39) करंचा मरपल्ली रस्ता
40) सोहले नांदली हेटेल कसा
41) चारभट्टी अंतरगाव रस्ता
42) धनेगाव फरी अंगारा रस्ता
43) चोप कळमगाव रस्ता
44) कुरुड कोंढाळा रस्ता
45) नागेपल्ली एकनपल्ली रस्ता
46) झिंगानूर मंगीगुडम रस्ता
47) मड्डीकडून पोचमार्ग
48) जोगनगुडा झिंगानुर
49) बोधनखेडा  मार्ग
50) तुंबडी कसा फिरंगे

flood situation update
Pune Rain Update: पुणे जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर... मुठा खोरेतील गावांचा संपर्क तुटला, मुळा नदीला महापूर Video पाहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.