HSC Exam News : बारावीचा इंग्रजीचा पेपर फोडला; परभणीत सहा शिक्षकांना अटक

maharashtra hsc exam hsc english peper leaked  police arrested six teachers in parbhani
maharashtra hsc exam hsc english peper leaked police arrested six teachers in parbhani
Updated on

HSC Exam News : कालपासून राज्यात बारावीच्या परीक्षांना सुरूवात झाली आहे. राज्यात १४ लाखांहून अधीक परीक्षार्थी या परीक्षेला सामोरे जात असून कॉपीमुक्त परीक्षांसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

मात्र यादरम्यान परभणीत इंग्रजीचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सहा शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकेच नाही तर या शिक्षकांना अटक देखील करण्यात आली आहे.

बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून राज्यभरात कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवलं जात आहे. यादरम्यान शिक्षकांनीच इंग्रजीचा बोर्डाचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कालपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षत पहिला पेपर इंग्रजीचा होता. यासाठी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केली. सोनपेठ पोलिसांनी हा प्रकार उघड केला.

maharashtra hsc exam hsc english peper leaked  police arrested six teachers in parbhani
Sharad Pawar News : "८३ वर्षांचा योद्धा विद्यार्थ्यांसाठी मैदानात"; पवारांची कमिटमेंट पाहून नेटकरी भारावले

सहा शिक्षाकांना अटक

या प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी उपकेंद्र संचालक कालिदास कुलकर्णी, इंग्रजी शिक्षक बालाजी बुलबुले यांच्यासोबत जिजामाता विद्यालयाचे शिक्षक गणेश जयतपाल, शिक्षकरमेश मारोती शिंदे, शिक्षक सिद्धार्थ सोनाळे, शिक्षक भास्कर तिरमले या सहा जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.

याशिक्षकांवर महाराष्ट्र विद्यापीठ, मंडळाच्या व इतर विधिनिष्ठ परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ कलम ५,७,८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबद्दलचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

maharashtra hsc exam hsc english peper leaked  police arrested six teachers in parbhani
Elon Musk Tweet : 'माझ्याबद्दल वाटेल ते बोला, पण…'; अक्कल शिकवणाऱ्यांना मस्कचा खोचक टोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.