तिवसा नगरपंचायतीवर यशोमती ठाकुरांचं वर्चस्व, भाजपसह राष्ट्रवादीला भोपळा

Congress Victory on Teosa Nagarpanchayat
Congress Victory on Teosa Nagarpanchayate sakal
Updated on

अमरावती : तिवसा नगरपंचायतच्या निवडणुकीत (Teosa Nagarpanchayat Election Result) पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांची परत एकदा एकहाती सत्ता आली असून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा त्यांच्या पक्षाच्या तीन जागा वाढल्याने अन्य पक्षांचा सुपडासाफ झाला आहे. विशेष म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अपक्षांना या निवडणुकीत खातेसुद्धा उघडता आले नाही. काँग्रेसने तब्बल १२ जागांवर विजय मिळविला असून शिवसेनेचे चार तर वंचित बहुजन आघाडीचा एक उमेदवार निवडून आला. वंचितने तिवसा नगरपंचायतीत पहिल्यांदाच आपले खाते उघडले आहे.

Congress Victory on Teosa Nagarpanchayat
Nagar Panchayat Election: नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष

गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नऊ उमेदवार निवडून आले होते, त्यात यावेळी तीनने वाढ झाल्याने काँग्रेसची बाजू अधिकच भक्कम झाली आहे. सेनेचे गेल्या वेळीसुद्धा चार उमेदवार निवडून आले होते. त्यांनी आपल्या जागा कायम राखल्या आहेत. भाजपला या नगरपंचायतीत मागच्या निवडणुकीत सुद्धा भोपळा फोडता आला नाही व यावेळीसुद्धा त्यांची तीच अवस्था आहे.

तिवसा नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागांसाठी मतदान पार पडले. शिवसेना आणि राष्ट्रवादीने मिळून काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तिवसा नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी तब्बल १२ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तिवसा नगरपंचायतवर पुन्हा एकहाती काँग्रेसची सत्ता आली आहे. शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत, तर वंचितला एका जागेवर समाधान मानावे लागेल. तसेच राष्ट्रवादी, भाजपला याठिकाणी खातंही उघडता आलं नाही.

तिवसा नगरपंचायतीसाठी ७६.८६ टक्के मतदान -

सार्वत्रिक निवडणुकीत तिवसा नगरपंचायतसाठी 76.86 टक्के मतदान झाले होते. ओबीसी आरक्षणमुळे रखडलेल्या तीन जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. याकरिता 13 उमेदवार रिंगणात होते. तीन जागांसाठी एकूण 1757 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष 903 तर 855 महिलांनी मतदान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.